'हे' आहे दीपिकाच्या स्लिम, हॉट आणि सेक्सी फिगरचं गुपित!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 01:19 PM2019-02-18T13:19:31+5:302019-02-18T13:20:28+5:30
आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच घायाळ करणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोण आपल्या हेल्दी फिटनेससाठीही ओळखली जाते. दीपिकाची फिगर आणि तिच्या फिटनेसमुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात.
आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच घायाळ करणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोण आपल्या हेल्दी फिटनेससाठीही ओळखली जाते. दीपिकाची फिगर आणि तिच्या फिटनेसमुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात. अशातच सर्वांच्याच मनात प्रश्न येतो की, दीपिकाच्या या फिटनेसचं रहस्य नक्की आहे तरी काय? आणि ती कशाप्रकारे स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवते? पण तुम्हाला माहीत आहे का? तिला स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. जाणून घेऊया दीपिकाच्या फिटनेसच्या रहस्याबाबत...
फिट आणि हेल्दी अभिनेत्रींमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली दीपिका काटेकोरपणे आपलं डाएट फॉलो करते. एवढचं नाही तर तिचा फिटनेस प्रोग्रामही ठरलेला असतो. याकडे ती चुकूनही दुर्लक्ष करत नाही. कार्डियो एक्सर्साइज, वेट ट्रेनिंग, डांस, योगा आणि पिलेट्स यासर्व एक्सरसाइज सोबतच दीपिकाने आपल्या regime मध्ये आणखी एक एक्सरसाइज अॅड केली आहे ती म्हणजे, रनिंग. वेट लॉस आणि टमी फॅट कमी करण्यासाठी हे समजणं अत्यंत गरजेचं आहे की, आठवड्यातून किती वेळा रनिंग करणं गरजेचं आहे. दीपिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही दिवसांपूर्वी आपला एक रनिंग व्हिडीओ टाकून सांगितले की, सध्या रनिंग तिचं नवीन ऑब्सेशन बनलं असून हे ती नियमितपणे फॉलो करत आहे.
दीपिका प्रत्येक दिवशी जवळपास सहा किलोमीटर पळते. यासोबतच तिचे इतर कार्डियो सेशनही असतात. प्रत्येक आठवड्यात अर्धा ते एक पाउंड वजन कमी करण्यासाठी एवढं पळणं पुरेस आहे. 30 मिनिटांसाठी तीन ते चार दिवसांसाठी रनिंग करणं गरजेचं आहे. पण लक्षात ठेवा रनिंग करण्याआधी वॉर्मअपसाठी पाच मिनिटं राखून ठेवा.
फक्त दीपिकाच नाही तर अनेक अशी लोक आहेत, जी जिममध्ये न जाता फक्त रनिंग करून स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवतात. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रनिंग करणं एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही equipmentची गरज भासत नाही. रनिंग करणं एक इंटेस वर्कआउटची पद्धत आहे, ज्यामुळे तुम्ही वजन लवकर कमी करू शकतात. फक्त एवढचं नाही तर, 5 ते 10 मिनिटांसाठीही रनिंग केल्याने तुमचं कलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवता येते आणि ब्लड शुगर संबंधातील समस्याही कमी होतात.
रनिंग करणं वेट लॉस करण्यासाठी फायदेशीर उपाय आहे. यामुळे पोटावर जमा झालेले फॅट्स बर्न होण्यासाठी मदत होते. रनिंग करत असताना शरीराचे सर्व स्नायू अॅक्टिव्ह असतात. तसेच कॅलरी बर्न होण्यासही मदत मिळते आणि तुमचं वजन लगेच कमी होतं. त्यामुळे शरीरात तृप्ति हॉर्मोन तयार होतं, जे भूक कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर असतं. एवढचं नाही तर रनिंग केल्यामुळे कॅन्सर, टाइप 2 डायबिटीज आणि हृदयरोग यांसारख्या आजारांपासून सुटका होते.
पाहूया दीपिकाचे काही हॉट आणि सेक्सी फोटो :