हाता-पायांमध्ये झिणझिण्या या गंभीर आजाराचा असू शकतात संकेत, जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 04:41 PM2022-09-16T16:41:54+5:302022-09-16T16:42:04+5:30
Vitamin Deficiency Causes: नसा बरोबर राहिल्या तर ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे होतं आणि झिणझिण्या येण्याची समस्या होत नाही. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या येते. ज्यामुळे नर्व डॅमेज आणि हातांमध्ये झिणझिण्या येण्याची समस्या होते.
Vitamin Deficiency Causes: काही लोकांची तक्रार असते की, त्यांच्या बॉडीमध्ये अचानक करंट लागल्यासारखं वाटलं. कधी कधी असं होत असेल तर यात काही समस्या नाही. असं रोज होत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. काही एक्सपर्ट्सनुसार, काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे असं होतं. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे नर्व डॅमेज होऊ लागतात आणि पुढे जाऊन तुम्ही पॅरालिलीसचेही शिकार होऊ शकता. नसा व्यवस्थित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन्स फार महत्वाची भूमिका बजावतात. नसा बरोबर राहिल्या तर ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे होतं आणि झिणझिण्या येण्याची समस्या होत नाही. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या येते. ज्यामुळे नर्व डॅमेज आणि हातांमध्ये झिणझिण्या येण्याची समस्या होते.
कोणते आहे हे व्हिटॅमिन्स?
व्हिटॅमिन B च्या सीरिजमधील व्हिटॅमिन बी1, बी6, बी12 आणि बी9 यासोबतच व्हिटॅमिन इ चं प्रमाण योग्य असेल तर ही समस्या होत नाही. याबाबत एक्सपर्ट्स सांगतात की, व्हिटॅमिन B1, B6, B12 B9 आणि E च्या कमतरतेमुळे हात-पायांवर झिणझिण्या येऊ लागतात. कधी कधी अॅंटीऑक्सिडेंटच्या कमतरतेमुळेही असं होतं. व्हिटॅमिन बी12 नसांना प्रोटेक्ट करतं. अॅंटीऑक्सिडेंट नसांना मजबूत करतात.
डाएटमध्ये करा बदल
जर हाता-पायांना झिणझिण्याची समस्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये अशेल तर याबाबत एक्सपर्ट सांगतात की, ही समस्या खाण्या-पिण्यातून दूर केली जाऊ शकते. तुम्ही दररोज आहारात यांचा समावेश करा. रोज एक्सरसाइज करा. व्हिटॅमिन बी1साठी कडधान्य, बीन्स, डाळी, नट्स आणि मांसाचं सेवन करा.
व्हिटॅमिन बी6 साठी बटाटे, नट्स, कडधान्य यांचं सेवन करा. तसेच व्हिटॅमिन बी 9 साठी हिरव्या पालेभाज्या, सूर्यफूलाच्या बिा आणि राजमाचं सेवन करा. व्हिटॅमिन बी 12 साठी डेअरी प्रॉडक्ट्स - दूध, दही, पनी आणि छासचं सेवन करा.