उन्हाळ्यात शरीरात होऊ लागते पाण्याची कमतरता, जाणून घ्या संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:19 AM2023-04-10T11:19:49+5:302023-04-10T11:20:24+5:30

Dehydration Signs In Summers : उन्हाळ्यात शरीरात पाणी कमी होण्याची शक्यता असते. ही समस्या तेव्हा होते जेव्हा आपलं शरीर पाणी ग्रहण करण्याची क्षमता गमावतो.

Dehydration problem symptoms in summers body gives signs | उन्हाळ्यात शरीरात होऊ लागते पाण्याची कमतरता, जाणून घ्या संकेत!

उन्हाळ्यात शरीरात होऊ लागते पाण्याची कमतरता, जाणून घ्या संकेत!

googlenewsNext

Dehydration Signs In Summers : आरोग्य चांगलं रहावं यासाठी केवळ पौष्टिक आहारच नाही तर पाणीही तेवढंच महत्वाचं आहे. शरीराच्या अर्ध्या समस्या पाण्याने दूर होतात. उन्हाळ्यात आपण नियमितपणे पाणी प्याल तर डिहायड्रेशनची समस्या होणार नाही. उन्हाळ्यात शरीरात पाणी कमी होण्याची शक्यता असते. ही समस्या तेव्हा होते जेव्हा आपलं शरीर पाणी ग्रहण करण्याची क्षमता गमावतो.

तेच जर तुम्हाला उन्हाळ्यात डोकेदुखी, थकवा आणि चक्कर येण्याची समस्या होत असेल तर हे आजारी पडण्याचे संकेत असू शकतात. अशात एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, ती म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे कसं जाणून घ्यावं शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य आहे किंवा नाही? चला जाणून घेऊन याची पद्धत..

उन्हाळ्यात डिहयड्रेशनची लक्षण

शरीरात पाण्याची कमतरता झाल्याचे संकेत आणि लक्षणांना गंभीरतेने घेतलं पाहिजे. हलक्या डिहायड्रेशनने तहान, तोंड कोरडं पडणे आणि थकवा जाणवू शकतो. याची गंभीर स्थिती झाली तर झटके आणि मृत्यूही होऊ शकतो.

1) लघवीचा रंग बदलणे - जर तुमच्या लघवी रंग डार्क झाला असेल तर हा याचा संकेत आहे की, तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता झाली आहे. जर तुमच्या लघवीचा रंग डार्क पिवळा झाला असेल तर याचा अर्थ असा आहे की, तुमच्या शरीराला अधिक पाण्याची गरज आहे.

2) थकवा - शरीरात पाण्याची कमी झाली की, थकवा जाणवतो. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर हा याचा संकेत आहे की, तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे.

3) तहान लागणे - तहान लागणं हे शरीराचं तुम्हाला सांगणं असतं की, तुम्ही पाणी पिण्याची गरज आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल किंवा पाणी पिणं विसराल तर तुम्ही ही सवय लगेच बदला.

4) चक्कर येणं - शरीरात पाण्याची कमतरता झाली तर चक्कर येऊ लागते. जर तुम्हाला अचानक चक्कर येत असेल तर हा संकेत आहे की, तुम्हाला जास्त पाण्याची गरज आहे. 

5) डोकेदुखी - उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशन डोकेदुखी आणि मायग्रेनचं कारण ठरू शकतं. जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल तर तुम्ही भरपूर पाणी प्यायला हवं.

6) तोंड कोरडं पडणे - जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा अचानक तोंड कोरडं पडू लागतं. सोबतच तोंडात चिकटपणा जाणवतो. जर तुम्हाला असं वाटत असेल तर लगेच एक ग्लास पाणी प्या.

Web Title: Dehydration problem symptoms in summers body gives signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.