पहिल्यांदाच कोरोनाचं 'असं' रुप आलं समोर; ४ वेळा महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 11:43 AM2020-07-09T11:43:21+5:302020-07-09T11:45:09+5:30
CoronaVirus : महिलेचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही अवाक् झाले आहेत. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारासाठी तिला दाखल करण्यात आलं होतं.
जगभरात कोरोनाचं थैमान पसरलं आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. जसजसा कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत आहे. तसतशी कोरोना व्हायरसची नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. कोरोनाबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना दिवसेंदिवस आपलं रूप बदलत आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात असाच एक प्रकार समोर आला आहे. महिलेचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही अवाक् झाले आहेत. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारासाठी तिला दाखल करण्यात आलं होतं.
डायबिटिस आणि हायपरटेंन्शनची समस्या असल्यामुळे प्रकृती अधिकच खालावत होती. म्हणून या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. तुमचा विश्वास बसणार नाही पण या वृध्द महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. एकदा नाही तर तब्बल चारवेळा या महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. या महिलेला कोरोना संसर्ग झाल्याची शंका डॉक्टरांना आल्याने त्यांनी सर्वात अत्याधुनिक असलेलं तंत्रज्ञान आरटी-पीसीआरच्या सहाय्याने चाचणी केली. पण तरी या ८० वर्षीय महिलेची कोरोना चाचणी १२ दिवसांत ४ वेळा करूनही निगेटिव्ह आली.
चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर त्यांनी या महिलेचे उपचार सुरू केले. ज्यावेळी पाचव्यांदा या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या एंटीबॉडीज विकसित झाल्याचं दिसून आलं. माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार २५ जून ते ७ जुलैदरम्यान या महिलेची चाचणी करण्यात आली होती. पण सातत्याने चाचणी करूनही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे आरटी-पीसीआर ही चाचणी कोरोनाचा शोध घेण्यासाठी उत्तम ठरली.
उपचार सुरू केल्यानंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर जेव्हा कोरोनाविरुद्ध लढत असलेल्या एंटीबॉडीज विकसित झाल्याचे कळले तेव्हा डॉक्टर चांगलेच चक्रावले. या महिला रुग्णाची केस लक्षात घेता लक्षणं दिसत नसतानाही शरीरात कोरोनाचं आक्रमण होऊ शकतं हे दिसून आले.
या कालावधीत व्हायरसची जीनोमिक संरचना बदलत आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांमध्ये डोळे येणं, मळमळणं, अतिसार होणं यांचा समावेश आहे. याशिवाय थंडी वाजणे, श्वास घ्यायला त्रास होणं, मासपेशींमध्ये वेदना, डोकेदुखी, घसा खवखवणं, सुगंध न जाणवणं, श्वास घ्यायला त्रास होणं यांचा समावेश आहे.
समोर आली कोरोनाची ३ नवी लक्षणं; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, वेळीच सावध व्हा
CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...