उष्णतेचा कहर! वाढत्या तापमानासमोर कोरोनाचा वेग मंदावला, पण 'या' आजारांचा धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 03:08 PM2023-05-16T15:08:56+5:302023-05-16T15:10:09+5:30

कोरोना असो वा इन्फ्लूएंझा किंवा H1N1, सर्व प्रकारचे व्हायरस या उष्णतेचा सामना करू शकत नाहीत.

delhi weather update corona virus weakened due to increased heat | उष्णतेचा कहर! वाढत्या तापमानासमोर कोरोनाचा वेग मंदावला, पण 'या' आजारांचा धोका वाढला

उष्णतेचा कहर! वाढत्या तापमानासमोर कोरोनाचा वेग मंदावला, पण 'या' आजारांचा धोका वाढला

googlenewsNext

वाढत्या उष्णतेसमोर आता कोरोना व्हायरसचा वेग मंदावला आहे. मात्र आता डायरिया आणि डिहाइड्रेशन धोका वाढला आहे. व्हायरस कमकुवत झाल्यामुळे शहरातील सर्व प्रकारच्या तापाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने घट झाली आहे. कोरोना असो वा इन्फ्लूएंझा किंवा H1N1, सर्व प्रकारचे व्हायरस या उष्णतेचा सामना करू शकत नाहीत. त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की दिल्लीतील लोक अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या तापाने त्रस्त होते, आता त्यांची यातून सुटका झाली आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी काही आजाराचा धोका वाढला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

उन्हाळ्यात डायरिया आणि डिहायड्रेशनची समस्या वाढते. विशेषत: जे रोज घराबाहेर पडतात, बाहेरचे अन्न-पाणी पितात, उन्हात काम करतात, त्यांच्यासाठी हे घातक ठरत आहे. एलएनजेपीचे वैद्यकीय संचालक डॉ सुरेश कुमार म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही. उष्णतेचा प्रभाव जसजसा वाढला आहे, तसतसे कोरोना संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे. ते म्हणाले की व्हायरस उष्णता सहन करू शकत नाही, विषाणू मरतो. त्यामुळेच सर्व प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बीएलके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप नय्यर म्हणाले की, सर्व प्रकारच्या तापाचे रुग्ण कमी झाले आहेत. इन्फ्लूएंझा प्रकरणे जवळजवळ संपली आहेत. कोविड रुग्ण कधीकधी एकटे येतात.

थंड हवामान व्हायरस वाढण्यास मदत करत होते. पूर्वी इन्फ्लूएन्झा पसरत होता, त्यासोबत H1N1 चे केसेस आले. नंतर जेव्हा कोविडचे नवीन रूप आले तेव्हा त्याचा प्रसारही झपाट्याने होऊ लागला. वारंवार हवामानातील बदलांमुळे संसर्ग पसरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत होते. अनेक महिन्यांपासून दिल्लीकरांना ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. डॉ.अनिल बन्सल यांनी सांगितले की, आता तापाचा धोका कमी झाला आहे, उष्णतेमुळे डिहायड्रेशन, उलट्या होण्याचा धोका जास्त असतो. 

डॉक्टरांनी सांगितले की, उष्णता वाढली की, लोकांना इच्छा नसतानाही थंड पाणी प्यावे लागते. दिल्लीत विकल्या जाणाऱ्या थंड पाण्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा दर्जा चांगला नाही. बर्फ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गुणवत्ता खूपच कमी आहे. या बर्फाचा उसाचा रस, लस्सी बनवणे इत्यादीसाठी वापर केला जातो. जे लोक कामानिमित्त उन्हात बाहेर पडतात, त्यांना थेट उन्हाचा तडाखा बसतो. कडक उन्हात घाम जास्त येतो, शरीरातील पाणी कमी होते आणि चालताना पाणी पिणे शक्य होत नाही, त्यामुळे डिहायड्रेशन होते. हे टाळण्याची गरज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: delhi weather update corona virus weakened due to increased heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.