आनंदी वैवाहिक जीवन जगत असाल तर 'या' गंभीर आजाराचा धोका कमी - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 11:12 AM2019-09-02T11:12:24+5:302019-09-02T11:13:05+5:30
जर तुम्ही घटस्फोटीत असालल तर हा धोका आणखी जास्त वाढतो. घटस्फोटीत लोक डिमेंशिया विकसीत करण्यात विवाहित लोकांच्या तुलनेत अधिक पुढे असतात.
(Image Credit : express.co.uk)
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला वेड(डिमेंशिया) लागण्याची किंवा तुमचं मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता कमी होते. पण जर तुम्ही घटस्फोटीत असालल तर हा धोका आणखी जास्त वाढतो. घटस्फोटीत लोक डिमेंशिया विकसीत करण्यात विवाहित लोकांच्या तुलनेत अधिक पुढे असतात. या रिसर्चमधून संकेत देण्यात आला आहे की, घटस्फोटीत पुरूषांमध्ये घटस्फोटीत महिलांच्या तुलनेत डिमेंशियाचे शिकार होण्याचा धोका अधिक जास्त वाढतो.
लग्न न करणं ठरू शकतं नुकसानकारक
मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक लियु सांगतात की, 'हा रिसर्च महत्वपूर्ण आहे. कारण अमेरिकेत अविवाहित वृद्ध वयस्कांची संख्या सतत वाढत आहे. द जर्नल ऑफ जेरोन्टोलॉजीमध्ये प्रकाशित या रिसर्चसाठी अभ्यासकांनी २०००-२०१४ पर्यंत आरोग्य-सेवानिवृत्ती रिसर्चमधील काही डेटाचं विश्लेषण केलं. अभ्यासकांनी ५२ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या १५०० पेक्षा अधिक उत्तरदात्यांचं विश्लेषण केलं आणि दर दोन वर्षांनी त्यांच्या वागण्या-हालचालीचं निरिक्षण केलं.
कसा केला गेला रिसर्च?
या रिसर्चमध्ये लोकांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आलं. एक घटस्फोटीत किंवा वेगळे झालेले, विधवा, अविवाहित आणि एकत्र राहणारे. यातील घटस्फोटीत लोकांना मनोभ्रंश म्हणजेच वेडेपणाचा(डिमेंशिया) धोका अधिक होता.
काय आहे कारण?
आरोग्यासंबंधी कारणे जसे की, व्यवहार आणि जुन्या स्थिती घटस्फोटीत आणि विवाहित लोकांमध्ये धोक्याला अधिक प्रभावित करते. पण दुसऱ्यांना प्रभावित करत नाही.