डेंग्यूपासून बचाव करायचाय?; मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:30 PM2019-07-25T15:30:41+5:302019-07-25T15:38:49+5:30

डेंग्यूपासून दूर राहण्यासाठी आधीच काही उपाय करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये त्याबाबत...

The dengue crisis dos and donts | डेंग्यूपासून बचाव करायचाय?; मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

डेंग्यूपासून बचाव करायचाय?; मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

Next

पावसाळ्यामध्ये डोकं वर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्यूचंही कारण ठरतो. वातावरणासोबतच अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो. एवढचं नाही तर, पावसाळा म्हणजे, अनेक किटकांसोबतच डासांच्या प्रजननाचा काळ असतो. या वातावरणामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. सध्या देशभरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातलं असून अनेक रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणं आढळून येत आहेत. अनेकांना डेंग्यूमुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. पण जर योग्य काळजी घेतली तर डेंग्यूपासून बचाव करणं शक्य होतं. 

जर तुम्हाला आधीच डेंग्यू झाला असेल आणि ते पुन्हा डेंग्यूला बळी पडले. तर त्यांच्यासाठी या आजाराशी लढणं कठिण होतं. त्यामुळे डेंग्यूपासून दूर राहण्यासाठी आधीच काही उपाय करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये त्याबाबत...

काय कराल? 

  • मॉस्किटो रिपेलन्टचा वापर करा. यासाठी अनेक स्प्रे आणि क्रिम्स बाजारात उपलब्ध आहेत. 
  • हात आणि पाय पूर्ण झाकले जातील असे कपडे परिधान करा. 
  • घराच्या खिडक्यांना जाळी लावा आणि घराचा दरवाजा कामाशिवाय उघडा ठेवू नका
  • झोपताना मच्छरदानीचा वापर करा आणि डासांना दूर ठेवणारी कॉइलही लावा. 
  • ताप येत असेल तर लगेचंच डॉक्टरांचा सल्ला घ्या, अजिबात दुर्लक्षं करू नका. 
  • डाएटवर लक्ष द्या, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 

 

काय करणं टाळाल?

  • पाणी साचून राहिल अशी कोणतीही वस्तू घराच्या आजूबाजूच्या परिसरात ठेवू नका. 
  • एखाद्या ठिकाणी खूप दिवसांपासून पाणी साचून राहिलं असेल तर त्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी पाठवू नका. 
  • डेंग्यूने पीडित कोणत्याही व्यक्तीला भेटण्यासाठी गेलात तर मास्कचा वापर करा. तसेच त्या व्यक्तीला स्पर्श करू नका. 
  • घरामध्ये कूलर असेल तर तो स्वच्छ केल्याशिवाय त्यामध्ये अजिबात पाणी टाकू नका. आधी कूलर व्यवस्थित स्वच्छ करा आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाका. 
  • एखाद्या परिसरात किंवा शहरात डेंग्यूचे रूग्ण आढळून आले असतील किंवा डेंग्यूची साथ आली असेल तर तिथे जाणं टाळा. 

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: The dengue crisis dos and donts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.