डेंग्यू निर्मूलन पंधरवाड्यातच बालकाचा घेतला डेंग्यूने बळी

By Admin | Published: August 15, 2016 12:51 AM2016-08-15T00:51:23+5:302016-08-15T00:51:23+5:30

जळगाव : डेंग्यूबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान डेंग्यू निर्मूलन पंधरवाडा राबविण्यात येत असताना याच पंधरवाड्यात डेंग्यूने बालकाचा बळी घेतला आहे.

Dengue eradication took place in Pandharwad with childhood dengue victim | डेंग्यू निर्मूलन पंधरवाड्यातच बालकाचा घेतला डेंग्यूने बळी

डेंग्यू निर्मूलन पंधरवाड्यातच बालकाचा घेतला डेंग्यूने बळी

googlenewsNext
गाव : डेंग्यूबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान डेंग्यू निर्मूलन पंधरवाडा राबविण्यात येत असताना याच पंधरवाड्यात डेंग्यूने बालकाचा बळी घेतला आहे.
डेंग्यू आजार नष्ट करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या या पंधरवाड्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे कर्मचारी, अधिकार्‍यांनी घरोघरी जाऊन पाण्याचे साठे कसे आहेत याची माहिती घेऊन त्यात डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. या सोबतच आवश्यक असल्यास गप्पी मासे उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात येऊन पाणीसाठे कोरडे करण्यावर भर देण्यात येत आहे. असे असले तरी बालकाचा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या कुलरचा वापर बंद झाला असला तरी त्यामध्ये अद्याप पाणी तसेच असल्याने ते खाली करण्याविषयीदेखील सूचना देऊन जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीही डेंग्यू डोके वर काढत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
चार महिन्यांपूर्वीच एकाचा मृत्यू....
याच वार्डात चार महिन्यांपूर्वी एकाचा डेंग्यूने बळी घेतला होता. तरीही या भागात सच्छता होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Web Title: Dengue eradication took place in Pandharwad with childhood dengue victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.