डेंग्यूची लक्षण आणि काय कराल यावर घरगुती उपाय? जाणून घ्या खास टिप्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 12:46 PM2024-07-01T12:46:15+5:302024-07-01T12:47:06+5:30
Dengue : लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही याचा जास्त धोका असतो. जर या आजारांच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो.
Dengue : पावसाळ्यात डासांची समस्या खूप वाढते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार खूप वाढतात. एडीज एजिप्टी नावाचा डास चावल्याने डेंग्यू आणि मलेरिया आजार होतो. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही याचा जास्त धोका असतो. जर या आजारांच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो.
डेंग्यूवर उपचार काय?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशननुसार, डेंग्यूवर काहीच असा ठोस उपाय नाही. फक्त याची लक्षणं कंट्रोल केली जाऊ शकतात. एम्सनुसार, जर डेंग्यूचेही काहीही लक्षण दिसली तर तर वेळीच सावध व्हा आणि योग्य ते उपचार करा. डॉक्टरांना भेटा. डेंग्यू झाला तर सगळ्यात आधी ताप येतो.
डेंग्यूची लक्षणं
- थंडी वाजून ताप येणे
- डोकं, मांसपेशींमध्ये वेदना
- डोळे दुखणे
- कमजोरी वाटणे
- मळमळ होणे
- भूक कमी लागणे
- तोंडाची चव बदलणे
- घश्यात दुखणे
- शरीरावर लाल चट्टे पडणे
काय घ्याल काळजी?
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने पॅरासिटामोल किंवा लिंबू सरबत प्या. रूग्णांना डिसप्रिन, एस्प्रीन कधीच देऊ नका. जर ताप १०२ डिग्री फॉरेन्हाइटपेक्षा जास्त असेल. तर ताप कमी करण्यासाठी हायड्रोथेरपी करा. म्हणजे डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवा. आहार चांगला घ्या.
काय खाल?
डेंग्यूचा ताप आला असेल तर रूग्णाला ओआरएसचं पाणी प्यायला द्या. जेवणात मिक्स व्हेज खिचडी, दलीया, डाळी, भात यांचा समावेश करा. सोबतच इम्यूनिटी वाढवण्यासाठी लिंबू आणि आल्याचा आहारात समावेश करा. फळांचं सेवन करा.
हायड्रोथेरपी करण्याची पद्धत
हायड्रोथेरपीने शरीराचं तापमान वेगाने कमी होण्यास मदत मिळते. यासाठी एक चादर थंड पाण्यात भिजवा. नंतर ती पाणी पिळून शरीराच्या चारही बाजूने गुंडाळा. नंतर वरून एक गरम ब्लॅंकेट अंगावर घ्या. चादर कोरडी होऊ द्या आणि मग काढा.