डेंग्युचे डास एका विशिष्ट वेळी चावतात आणि विशिष्ट ठिकाणीच असतात, जाणून घ्या केव्हा अन् कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 03:21 PM2021-11-12T15:21:04+5:302021-11-12T15:28:59+5:30
वेगवेगळ्या जातींमधूनही तुम्हाला डेंग्यूची लागण चार वेळा होऊ शकते. डेंग्यू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये थेट पसरत नाही. महत्वाचं म्हणजे तुम्ही या चार विषाणूंद्वारे चारवेळा डेंग्यू संक्रमित देखील होऊ शकतो.
देशातील अनेक राज्यात डेंग्यूचे संक्रमण अधिक वाढत आहे. डेंग्यूचे संक्रमण एरिस मच्छर चावल्यामुळे पसरतो. हे मच्छर तेव्हा संक्रमित होतो जेव्हा तो डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीला चावतो. यामुळे काळजी घेणं अत्यंत महत्वाची.
डेंग्यूचे विषाणू एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट जात नाहीत. डेंग्यूचे संक्रमण DEN-1, DEN-2, DEN-3 आणि DEN-4 विषाणूंद्वारे पसरतो. या चार विषाणूंना 'सेरोटाइप' म्हणतात कारण ते प्रतिपिंडांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. वेगवेगळ्या जातींमधूनही तुम्हाला डेंग्यूची लागण चार वेळा होऊ शकते. डेंग्यू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये थेट पसरत नाही.
महत्वाचं म्हणजे तुम्ही या चार विषाणूंद्वारे चारवेळा डेंग्यू संक्रमित देखील होऊ शकतो. डेंग्यू पसरवणारे मच्छर खास करून दुपारी चावतात. खास करून सूर्योदयाच्या २ तासानंतर आणि सूर्यास्ताच्या एक तास अगोदर ती सक्रीय असतात. तसेच सर्वाधिक उजेड असलेल्या ठिकाणी रात्री देखील डेंग्यूचे मच्छर सक्रीय असतात. डेंग्यूच्या मच्छरांचा चावण्याचा धोका ऑफिस, मॉल, ऑडिटोरिअम, इनडोअर, स्टेडिअम सारख्या ठिकाणी अधिक असतो. कारण या ठिकाणी आर्टिफिशिअल लाईट्स सर्वाधिक असतात. आणि नैसर्गिक प्रकाश नसतो.
लक्षणे किती दिवस आणि कोणती
डेंग्यूचा मच्छर चावल्यानंतर तीन ते चार दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे जवळपास १० दिवस राहतात. अचानक ताप येणं, डोकं दुखणं, डोळे दुखणं, सांधे दुखणं, थकवा, अशक्तपणा, त्वचेवर लाल चट्टे आणि नाकातून रक्तस्त्राव होणं. हे डेंग्यूची लक्षणे आहेत. संपूर्ण शरीरात खूप त्रास जाणवतो. यामुळे या तापात खूप आराम करणं गरजेचं असतं.
शरीरावर होणारा परिणाम
शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. एवढंच नव्हे तर याकाळात शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका. तसेच या दिवसात लिक्विड डाएट खूप महत्वाचा आहे.
आहार कसा असावा?
या काळात नारळ पाणी पिणं महत्वाच आहे. तसेच पपई, किवी, डाळिंब आणि हिरव्या रंगाच्या भाज्या खाणं अधिक फायदेशीर असतात. सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहा. आणि तुमच्या प्लेटलेटची चाचणी करत राहा.