बापरे! डेंग्यूनं पुन्हा डोकं वर काढलं; तुम्हाला कोरोना झालाय की डेंग्यू? 'असं' ओळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 06:14 AM2021-10-03T06:14:36+5:302021-10-03T06:14:54+5:30
कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्येही तापाचा समावेश आहे. त्यामुळे ताप आला की प्रथमत: कोरोनाची भीती वाटते.
कोरोनाची निष्क्रियतेकडे वाटचाल सुरू असताना आता डेंग्यू या जुन्या आजाराने डोके वर काढले आहे. मात्र, डेंग्यूची लक्षणे कोरोनासारखीच असल्याने संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. नेमके निदान होण्यास विलंब होत असल्याने बाधितांचीही पाचावर धारण बसत आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ या कोरोना आणि डेंग्यूतील फरक...
कोरोना आणि डेंग्यूची समान लक्षणे
तीव्र ताप
सर्दी होणे
अंगदुखी
थंडी वाजणे
मळमळणे
थकवा जाणवणे
का वाढत आहे डेंग्यूचे प्रमाण?
- दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणारा आजार, अशी डेंग्यूची ओळख आहे.
- या आजारात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा ताप येतो.
- कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्येही तापाचा समावेश आहे. त्यामुळे ताप आला की प्रथमत: कोरोनाची भीती वाटते.
- तापाची तीव्रता दीर्घकाळ राहिल्यास डेंग्यू की कोरोना हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
लक्षणांमधला मुख्य फरक
- कोरोनामध्ये ताप येणे हे प्राथमिक लक्षण असले तरी त्यात चढ-उतार होत राहतात. सलग आठवडाभर ताप राहिल्यास कोरोना समजावा.
- डेंग्यूमध्ये तापाचे प्रमाण १०३ ते १०५ असे असते. आणि तो सातत्याने राहतो. त्यात चढ-उतार होत नाही.
- डेंग्यूचा ताप नियंत्रणात आणण्यासाठी तातडीच्या वैद्यकीय उपायांची आवश्यकता भासते.
- एका अभ्यासानुसार डीईएनव्ही-२ हा ग्यूचा विषाणू अधिक आक्रमक झाला असल्याने लक्षणांची तीव्रता वाढली आहे.