डेंग्यूवर कोणतीही लस उपलब्ध नाही; मग उपचार कसा केला जातो? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:58 PM2024-07-03T18:58:45+5:302024-07-03T18:59:21+5:30

पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागते.

Dengue Treatment: There is no vaccine available for dengue; So how is treatment done? see | डेंग्यूवर कोणतीही लस उपलब्ध नाही; मग उपचार कसा केला जातो? पाहा...

डेंग्यूवर कोणतीही लस उपलब्ध नाही; मग उपचार कसा केला जातो? पाहा...

Dengue Virus Treatment: डेंग्यू हा एडिस प्रजातीच्या डासांपासून पसरणारा गंभीर आजार आहे. 2019 च्या आकडेवारीनुसार, जगभरात 5.02 मिलियन लोकांना डेंग्यूची लागण झाली होती. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. याचे कारण म्हणजे, हा डास साचलेल्या पाण्यावर वाढतो. विसेष म्हणजे, डेंग्यूवर सध्या कोणताही ठोस उपाय किंवा औषध उपलब्ध नाही. पण, तरीदेखील डॉक्टर या आजाराचा उपचार करतात.

डेंग्यूचा उपचार कसा केला जातो?
डेंग्यू व्हायरसवर सध्या कोणतीही लस किंवा ठोस उपचार उपलब्ध नाही. डेंग्यू व्हायरसचा परिणाम कमी करण्यासाठी अँटीबॉडीजचा वापर केला जातो. डॉक्टर सामान्यतः ॲसिटामिनोफेनसह औषधांचा वापर करतात. 

डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूचा डास चावल्यानंतर 4 ते 6 दिवसांनी लक्षणे दिसायला सुरू होतात. यात अचानक ताप वाढणे, डोकेदुखी, डोळा दुखणे, सांधे व स्नायू दुखणे, थकवा, मळमळ, उलट्या, अंगावर लाल पुरळ येणे आणि नाकातून किंवा हिरड्यांतून रक्त येणे, यांचाही समावेश होतो.

अशाप्रकारची लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. याशिवाय, डेंग्यूपासून बचाव घराच्या आसपास पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. डास चावू नये, यासाटी पूर्ण बाह्यांचा शर्ट किंवा टी-शर्ट घालावा, संध्याकाळी घराच्या खिडक्या-दारे बंद करावू किंवा वापरा जाळी वापरावी. 

Web Title: Dengue Treatment: There is no vaccine available for dengue; So how is treatment done? see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.