ब्रश करताना अजिबात करू नका 'ही' चूक, डॉक्टरांनी दिला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 10:29 AM2024-07-01T10:29:55+5:302024-07-01T10:30:43+5:30

Teeth Health : बरेच लोक दिवसातून दोनदा ब्रश करतात. पण बरेच लोक ब्रश करताना काही चुका करतात. ज्यामुळे दातांचं आरोग्य बिघडतं. दात लवकर कमजोर होतात.

Dentist tells Don't do this mistake while brushing your teeth | ब्रश करताना अजिबात करू नका 'ही' चूक, डॉक्टरांनी दिला इशारा!

ब्रश करताना अजिबात करू नका 'ही' चूक, डॉक्टरांनी दिला इशारा!

Teeth Health : दात स्वच्छ असणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं. कारण दात स्वच्छ नसतील तर आपल्या पोटात बॅक्टेरिया जातात आणि आरोग्य बिघडतं. लोक रोज सकाळी उठल्यावर दात स्वच्छ करतात. बरेच लोक दिवसातून दोनदा ब्रश करतात. पण बरेच लोक ब्रश करताना काही चुका करतात. ज्यामुळे दातांचं आरोग्य बिघडतं. दात लवकर कमजोर होतात.

ब्रश करताना काही चुका केल्या तर दात दुखतात, सैल होतात, हिरड्यांवर सूज येते, किड लागते आणि दात पडतातही. अशात दात ब्रश करताना कोणती चूक करू नये याबाबत डेंटीस्ट डॉ. शादी मनोचेहरी यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओत सांगितलं की, कॉफी प्यायल्यानंतर ब्रश करू नये. याचं कारण जाणून घेऊ.

जर तुम्हाला कॉफी प्यायल्यानंतर ब्रश करण्याची सवय असेल तर ही सवय लगेच बदला. कारण कॉफी ही अॅसिडिक असते. जर तुम्ही कॉफी प्यायल्यानंतर ब्रश करत असाल तर याचा अर्थ तुम्ही कॉफीमधील अॅसिड दातांवर घासत आहात. ज्यामुळे दातांवरील थर कमजोर होतो.

दातावरील थराचं होईल नुकसान

डॉक्टरांनी सांगितलं की, दातांवर सकाळी खूपसारे बॅक्टेरिया असतात. जे सकाळी दूर करणं गरजेचं असतं. जर दात स्वच्छ केले नाही तर आपण जे खातो ते दातांमध्ये अडकून राहतं आणि दात कमजोर होतात. दातांना किड लागते. कॉफीमधीलही अॅसिड हे दातांना खराब करतं. त्यामुळे कधीच कॉफी प्यायल्यानंतर ब्रश करू नका. 

कॉफी प्यायल्यावर किती वेळाने करावा ब्रश

दातांची समस्या होऊ नये म्हणून कॉफी प्यायल्यानंतर ३० ते ६० मिनिटांनी ब्रश करावा. जर तुम्हाला ब्रश करायचाच असेल तर माउथवॉशने किंवा पाण्याने गुरळा करा.
 

Web Title: Dentist tells Don't do this mistake while brushing your teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.