पेनकिलरचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास होतात हे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 11:47 AM2018-06-29T11:47:53+5:302018-06-29T11:48:12+5:30
केमिकलचे आपल्या शरीरावर अनेक साईड इफेक्ट्स होतात. पण काय तुम्हाला माहीत आहेत की, पेन किलरचा आपल्या शरीरावर काय प्रभाव पडतो. चला जाणून घेऊ....
ऑफिस आणि घरातील कामांमुळे नेहमीच अनेकांना धावपळ करावी लागते. त्यामुळे अनेकांना डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप अशा समस्या होत असतात. यावर सोपा उपाय म्हणून अनेकजण डॉक्टरकडे न जाता एक पेन किलर खातात. आपणा सर्वांनाच माहीत आहे की, केमिकलचे आपल्या शरीरावर अनेक साईड इफेक्ट्स होतात. पण काय तुम्हाला माहीत आहेत की, पेन किलरचा आपल्या शरीरावर काय प्रभाव पडतो. चला जाणून घेऊ....
1) ड्रग अॅडिक्ट
ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे जगभरातील लोक हैराण आहेत. अमेरिकेत पेन किलरच्या चुकीच्या वापरामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. औषधांचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्यांची सवय लागते. यावर उपचार करणे डॉक्टरांनाही कठीण असतं.
2) किडनीचं नुकसान
तुम्ही जे औषध घेता ते तुमच्या रक्तात मिश्रित होते. आणि मग किडनीतून फिल्टर झाल्यावर शरीरातून निघून जातं. या प्रक्रियेत ड्रग किडनीपर्यंत होत असलेल्या रक्ताच्या प्रवाहाला प्रभावित करतं. त्यामुळे अॅलर्जिक रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. याने किडनीला नुकसान होऊ शकतं. एका रिसर्चनुसार, याप्रकारच्या औषधांमुळे 20 टक्क्यांपेक्षा जास्त किडनी फेल होण्याची प्रकरणे होतात.
3) डिप्रेशन
पेन किलरमुळे डिप्रेशनही येतं. तज्ज्ञांनी याचा खुलासा केलाय की, ओपिऑडसारख्या पेन किलर्सचा अधिक वापर केल्यास डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो.
4) डोकेदुखी आणि ताप
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अॅन्ड क्लीनिकल अॅक्सीलेंसनुसार, डोकेदुखीसाठी पॅरोसिटामोल, अॅस्प्रिन आणि नॉन स्टीरॉयडल अॅंटी इनफ्लेमेटरी ड्रग जसे की, इबप्रेन अधिक प्रमाणात खाणे धोकादायक आहे. काही लोकांना यामुळे डोकेदुखी आणि ताप येण्याची शक्यता असते.
5) हार्टअटॅक
कोपेनहेगन युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, डेनमार्कच्या अभ्यासकांनुसार एका रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की, इबूप्रोफेनच्या अधिक सेवनामुळे लोकांच्या मृत्यूची शक्यता वाढते. काहींना यामुळे हार्टअटॅकही येऊ शकतो.