केसगळती होऊ नये म्हणून केसांना तेल कसं लावावं? डर्मेटोलॉजिस्टने दिला खास सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 12:37 PM2024-08-07T12:37:41+5:302024-08-07T12:38:04+5:30
Hair Care Tips: पूर्वीपासून केसांची तेलाने मालिश करणे हा सगळ्यात चांगला उपाय मानला जातो. पण बरेच लोक केसांची तेलाने चुकीच्या पद्धतीने मालिश करतात. अशात
Hair Care Tips: केसगळती किंवा केसांची योग्य वाढ न होणं ही आजकाल जास्तीत जास्त लोकांना होणारी समस्या आहे. कमी वयातच लोकांचे केस गळत असून लोकांचं टक्कल पडत आहे. अशात लोक केसगळती थांबवण्यासाठी किंवा केसांची वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. पण या उत्पादनांमुळे सगळ्यांनाच फायदा होतो असं नाही. उलट अनेकांना यातील केमिकल्समुळे नुकसान होतं. पूर्वीपासून केसांची तेलाने मालिश करणे हा सगळ्यात चांगला उपाय मानला जातो. पण बरेच लोक केसांची तेलाने चुकीच्या पद्धतीने मालिश करतात. अशात
डर्मेटोलॉजिस्ट डॉ. शिवंती एमडी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी केसांना तेलाने मालिश कशी करावी याबाबत सांगितलं आहे.
केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत
डर्मेटोलॉजिस्टनी सांगितलं की, जास्तीत जास्त लोक केसांना खोबऱ्याचं तेल लावणं पसंत करतात. पण तुम्ही हवं ते तेल केसांना लावू शकता. तेल केसांना लावण्यासाठी आधी हलकं गरम करून घ्यावं. तेल जास्त गरम करू नये. तेल कोमट असेल तर डोक्याच्या त्वचेमध्ये चांगलं मुरतं. केसांच्या मूळात आधीच तेल आणि सीबम असतं त्यामुळे तेल केसांना लावावे. जर तुम्हाला आधीच केसात कोंडा होण्याची समस्या असेल तर तेल डोक्याच्या त्वचेवर अजिबात लावू नये.
केस धुण्याच्या २ ते ३ तासांआधी केसांना तेल लावावे. डर्मेटोलॉजिस्टचं मत आहे की, रात्रभर तेल लावून ठेवल्याने केसांना फार काही खास फायदे मिळत नाहीत. एक्ने आणि कोंड्याची समस्या यामुळे वाढू शकते.
केस धुण्यासाठी नेहमी एकाच शाम्पूचा वापर करावा. डोक्याच्या त्वचेवरून किंवा केसांवरून तेल पूर्णपणे काढण्यासाठी केस दोनदा धुवू शकता. जर केसांवर तेल जास्त असेल तर तुम्ही आठवड्यातून १ ते २ वेळा शाम्पूचा वापर करू शकता. रोज शाम्पूचा वापर केल्याने केसांचं नुकसान होतं.