दारूमुळे होणाऱ्या आजारांची ही लक्षणे वेळीच ओळखा, तरच रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 10:24 AM2022-10-22T10:24:04+5:302022-10-22T10:49:41+5:30

Alcohol related disease : साधारण ९० टक्के हेवी ड्रिंकर्समध्ये फॅटी लिव्हर आढळतो. तर २५ टक्के लोकांना अल्कोहोलिक हेपेटाटिस आणि १५ टक्के लोकांना सिसोसिस होतो. अनेक वर्ष मद्यसेवन करत राहिल्याने लिव्हरवर सूज येते, याला सिरोसिस म्हणूनही ओळखलं जातं.

Detail about alcohol related liver disease, you should know about this | दारूमुळे होणाऱ्या आजारांची ही लक्षणे वेळीच ओळखा, तरच रहाल फायद्यात...

दारूमुळे होणाऱ्या आजारांची ही लक्षणे वेळीच ओळखा, तरच रहाल फायद्यात...

googlenewsNext

Alcohol related disease : अत्याधिक मद्यसेवन केल्याने दुष्परिणामांपैकी एक म्हणजे लिव्हरसंबंधी आजार. अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिजीज म्हणजेच एआरएलडी अनेक वर्ष मद्यसेवन केल्याने होतो. जेव्हा तुम्ही अनेक वर्ष मद्यसेवन करता तेव्हा याने स्टीटोसिस म्हणजेच फॅटी लिव्हर विकसित होतं.

साधारण ९० टक्के हेवी ड्रिंकर्समध्ये फॅटी लिव्हर आढळतो. तर २५ टक्के लोकांना अल्कोहोलिक हेपेटाटिस आणि १५ टक्के लोकांना सिसोसिस होतो. अनेक वर्ष मद्यसेवन करत राहिल्याने लिव्हरवर सूज येते, याला सिरोसिस म्हणूनही ओळखलं जातं. सिरोसिस हा लिव्हर रोगाचा अंतिम टप्पा असतो. चला जाणून घेऊ याबाबत...

सुरूवातीचे संकेत

अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिजीज पूर्णपणे स्पष्ट नसतात, पण याने शरीराच्या वेगवेगळ्या प्रणाली प्रभावित होतात. हा आजार झाला तर व्यक्तीला सतत अस्वस्थ वाटतं. इतर लक्षणांमध्ये पोट दुखणे, मळमळ होणे, संडास लागणे आणि भूक कमी होणे या समस्या दिसू शकतात. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष करत मद्यसेवन सुरूच ठेवलं तर लिव्हरची समस्या आणखी वाढू शकते.

लक्षणे

जेव्हा अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिजीजची समस्या वाढू लागते, तेव्हा याची काही लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात.

- कावीळ, डोळे किंवा त्वचेवर पिवळे डाग

- पोटात तरल पदार्थ तयार होणे

- त्वचेवर अधिक जास्त खाज येणे

- वजन कमी होणे

- कमजोरी आणि मासंपेशीमध्ये थकवा जाणवणे

- उलटी आणि मळमळ होणे

- विष्ठेतून रक्त येणे

उपाय 

या आजाराच्या उपचाराचं सर्वात पहिलं पाऊल म्हणजे मद्यसेवन पूर्णपणे बंद करावं. सोबतच आजार ठीक झाल्यावर पुन्हा मद्यसेवन करू नये. सुरूवातीला भलेही मद्यसेवन पूर्णपणे बंद करणं कठीण असेल, पण तुम्ही हळूहळू याचं प्रमाण कमी करू शकता. त्यानंतर पूर्णपणे बंद करा.

मद्यसेवनाची सवय सोडवण्यासाठी चिकित्सक मदत घेतली जाऊ शकते. यात वेगवेगळ्या थेरपींच्या माध्यमातून तुम्ही मद्यसेवन बंद करू शकता. तेच लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तुम्हाला उपचारात मदत मिळू शकते. धुम्रपान बंद करा. सोबतच वजन नियंत्रणात ठेवा. वजन आणि धुम्रपान अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिजीजल अधिक मजबूत करतं. तसेच नियमित मल्टीव्हिटॅमिनचं सेवन करणंही फायदेशीर ठरतं.

Web Title: Detail about alcohol related liver disease, you should know about this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.