लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी 'हे' पदार्थ करतात मदत; आहारात करा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 03:59 PM2019-04-08T15:59:17+5:302019-04-08T16:10:50+5:30
लिव्हर हे शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण अंगांपैकी एक आहे. लिव्हरच्या मदतीने शरीरातील पचनक्रिया, मेटाबॉलिज्म, इम्यूनिटी आणि पोषक पदार्थांचं स्टोरेज यात महत्त्वाची भूमिका असते.
लिव्हर हे शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण अंगांपैकी एक आहे. लिव्हरच्या मदतीने शरीरातील पचनक्रिया, मेटाबॉलिज्म, इम्यूनिटी आणि पोषक पदार्थांचं स्टोरेज यात महत्त्वाची भूमिका असते. तसेच लिव्हर आपल्या शरीरातील रक्त प्रक्रिया नियंत्रित करते, त्यातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्व, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते. तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे. आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्याचं काम लिव्हर करतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्ट्रॉल बनवत असतं.
लिव्हर निरोगी नसल्यास या समस्या उद्भवतात
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलेली लाइफस्टाईल यामुळे लिव्हरवर बदाव वाढतो, यामुळे विषारी पदार्थ आणि फॅटची योग्यप्रकारे प्रक्रिया होत नाही. या कारणाने शरीरात जाडेपणा, हृदय रोग, थकवा, डोकेदुखी, पचनक्रिया बिघडणे, अॅलर्जी आणि इतरही समस्या होतात. अशावेळी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे ठरते.
बीट
बीट हे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि याच्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी मदत करतं. यात भरपूर प्रमाणात प्लांट फ्लावनॉयड्स आणि बीटा-कॅरोटीन आढळतात जे लिव्हरची क्रिया ठिक करतं. सोबतच बीट हे रक्त शुद्ध करण्यासाठीही फायदेशीर फळ आहे. त्यामुळे रोज जेवण करताना या आहारात समावेश करावा. बीटाचा ज्यूस किंवा सूपाच्या स्वरूपातही तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता.
बेरीज
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आि रासबेरी लिव्हर डॅमेज होण्यापासून रोखतात. बेरीज मेटाबॉलिज्म बूस्ट करते आणि फॅटी लिव्हरची समस्या दूर करते. याचबरोबर डायजेस्टिव्ह सिस्टममधून टॉक्सिन्स नॅचरली बाहेर टाकण्यासाठी मदत करते.
लसूण
लसूण लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी सर्वात जास्त परिणामकारक ठरतो. ताज्या लसणाची एक पाकळी दररोज खाल्याने लिव्हर डिटॉक्स होतं. यामध्ये सेलेनियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे लिव्हर एंजाइम्स टॉक्सिन्स फल्श करण्यास मदत करतात.
हिरव्या पालेभाज्या
क्रूसीफेरी हिरव्या पालेभाज्या म्हणजेच, ब्रोकलीमध्ये आयर्न, व्हिटॅमिन्स आणि अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये ग्सूकोसिनोलेट आढळून येतं. ज्यामुळे लिव्हरला डिटॉक्सिफाइंग एजेंट्स काढून टाकण्यासाठी मदत होते. याव्यतिरिक्त हिरव्या भाज्याही लिव्हर डिटॉक्स करतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही गोष्टीचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.