न्यूट्रिशनिस्टचा सल्ला 'या' ३ डिटॉक्स ड्रिंकचं सेवन करून कमी होईल वजन, पोटही होईल साफ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 10:52 AM2024-08-17T10:52:33+5:302024-08-17T10:55:55+5:30

Detox Water: काही डिटॉक्स ड्रिंक्सचं सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि अनेक समस्याही दूर होतात. 

Detox Water: 3 best detox drinks for weight loss and gut health | न्यूट्रिशनिस्टचा सल्ला 'या' ३ डिटॉक्स ड्रिंकचं सेवन करून कमी होईल वजन, पोटही होईल साफ...

न्यूट्रिशनिस्टचा सल्ला 'या' ३ डिटॉक्स ड्रिंकचं सेवन करून कमी होईल वजन, पोटही होईल साफ...

Detox Water: एक्सपर्ट्स वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक्स पिण्याचा सल्ला देत असतात. या ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे शरीरातील फ्री रॅडिकल्स दूर करण्यास मदत करतात. शरीरात अनेकदा विषारी पदार्थ जमा होऊ लागतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या गंभीर समस्या होऊ लागतात. अशात काही डिटॉक्स ड्रिंक्सचं सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि अनेक समस्याही दूर होतात. 

न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर अमीना हसन यांनी तीन अशा ड्रिंक्सबाबत सांगितलं आहे ज्याद्वारे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. पचनक्रिया मजबूत करणे, बद्धकोष्ठता दूर करणे, वजन कमी करणे आणि हाय शुगर लेव्हल कमी करण्यास यांनी मदत मिळू शकते. चला जाणून घेऊ काय आहेत हे ड्रिंक्स आणि कसे तयार कराल.

डिटॉक्स ड्रिंक कसं बनवाल?

१) पहिलं डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी एका बॉटलमध्ये उकडलेलं पाणी घ्या त्यात २ चमचे ओवा टाका. हे पाणी कोमट झाल्यावर सेवन केल्याने पोट फुगण्याची समस्या, बद्धकोष्ठता आणि अपचन अशा समस्या लगेच दूर होतील.

२) दुसरं डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी उकडलेल्या पाण्यात दालचीनी टाका. हे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म बूस्त होतं ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत मिळते. याने ड्रिंकने तुमची भूक कंट्रोल करण्यासही मदत मिळते आणि शुगर लेव्हलही कंट्रोल राहते.

३) तिसरं डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी उकडलेल्या पाण्यात मेथीचे दाणे टाका. या पाण्याने शरीरात इन्फ्लेमेशन कमी होतं ज्यामुळे शरीरात होणारी वेदना कमी होते. पुरूषांमध्ये याने टेस्टेटोरॉन लेव्हलही वाढतं.

न्यूट्रिशनिस्टनुसार, या तिन्ही डिटॉक्स ड्रिंकमध्ये शून्य कॅलरी असतात. तुम्ही या तिन्ही ड्रिंकचं सेवन वजन कमी करण्यासाठी करू शकता आणि कधीही पिऊ शकता.
 

Web Title: Detox Water: 3 best detox drinks for weight loss and gut health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.