धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सीचं निदान, जाणून घ्या काय आहे हा आजार आणि याची लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:24 IST2025-02-21T14:23:45+5:302025-02-21T14:24:54+5:30

What is Bell’s Palsy: धनंजय मुंडे यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली कि, त्यांना 'बेल्स पाल्सी' या आजाराचं निदान झालं आहे

Dhananjay Munde diagnosed with Bell's Palsy, know what this disease is and its symptoms! | धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सीचं निदान, जाणून घ्या काय आहे हा आजार आणि याची लक्षणं!

धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सीचं निदान, जाणून घ्या काय आहे हा आजार आणि याची लक्षणं!

What is Bell’s Palsy: राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी २० फेब्रुवारी २०२५ रोजी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली कि, त्यांना 'बेल्स पाल्सी' या आजाराचं निदान झालं आहे आणि त्यांना व्यवस्थित बोलण्यात अडचण येत आहे. ज्यामुळे ते कॅबिनेट मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकते नाही. त्यांना असंही स्पष्ट केलं की, ते रिकव्हर झाल्यावर समोर येतील.

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "माझ्या दोन्ही डोळ्यांची सर्जरी १५ दिवसांआधी झाली होती. साधारण त्यांना १० दिवस डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. खासकरून प्रखर प्रकाश, दूळ आणि उन्हापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. यादरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्याही एका आजाराचं निदान झालं. या आजारामुळे मी २ मिनिटंही व्यवस्थित बोलू शकत नाहीये. त्यामुळे मी एक किंवा दोन कॅबिनेट मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकलो नाही".

काय आहे बेल्स पाल्सी आजार?

बेल्स पाल्सी एक अशी मेडिकल कंडीशन आहे ज्यात चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानक, अस्थायी कमजोरी किंवा पॅरालिसीसचं कारण बनू शकते. हे फेशिअल नर्वमध्ये सूज किंवा डॅमेज झाल्या कारणानं होतं. ज्यात चेहऱ्याच्या एका बाजूची मुव्हमेंट कंट्रोल होते. यामुळे चेहऱ्याची त्वचा लटकणं, डोळे बंद करण्यास अडचण, बोलण्यात समस्या आणि चेहऱ्याची हालचाल करण्यास समस्या होते.

बेल्स पाल्सी होण्याची कारणं...

बेल्स पाल्सी होण्याचं नेमकं कारण नेहमी क्लिअर नसतं. पण ही समस्या अनेकदा वायरल इन्फेक्शनसारख्या जसे की, हर्पीस सिंप्लेक्स, एपस्टीन-बार वायरस किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शनशी जोडली जाते. दुसऱ्या रिक्स फॅक्टर्समध्ये डायबिटीस, प्रेग्नेन्सी, स्ट्रेस आणि कमजोर इम्यूनिटी यांचाही समावेश आहे.

आजाराची लक्षणं

- चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक कमजोरी किंवा लकवा

- चेहऱ्याची त्वचा लटकणे आणि हसण्यास समस्या

- डोळे बंद करण्यास समस्या

- जेवणाची चव न लागणे

- एका कानात आवाजाबाबत वाढलेली संवेदनशीलता

काय आहेत उपचार?

बेल्स पाल्सी ही समस्या फार काळ राहत नाही. जास्तीत जास्त रूग्णांमध्ये ही समस्या काही आठवड्यात तर काहींमध्ये काही महिन्यात दूर होते. उपचाराबाबत सांगायचं तर यात कॉर्टिकोस्टेरॉइड्स (Corticosteroids), अ‍ॅंटी-वायरल औषधं (Antiviral medications), फिजिकल थेरपी (Physical therapy) आणि डोळ्यांची काळजी घेणं याचा समावेश आहे. वेळीच उपचार घेतले तर लगेच रिकव्हरी होते.

Web Title: Dhananjay Munde diagnosed with Bell's Palsy, know what this disease is and its symptoms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.