Diabetes: 'या' भाज्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात, आहारात करा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 03:25 PM2021-09-12T15:25:41+5:302021-09-12T15:26:35+5:30

Blood Sugar Control : मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत ते जाणून घेऊया.

Diabetes: 15 vegetables that control blood sugar level | Diabetes: 'या' भाज्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात, आहारात करा समावेश 

Diabetes: 'या' भाज्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात, आहारात करा समावेश 

googlenewsNext

सध्या मधुमेह हा केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात एक गंभीर समस्या आहे. केवळ वृद्धच मधुमेहाचे रुग्ण आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण आज प्रत्येक वयोगटातील व्यक्ती मधुमेहाच्या कचाट्यात आहे. हे केवळ वृद्धांमध्येच नाही तर मुलांमध्येही मधुमेहाची लक्षणे आढळत आहेत. अशा स्थितीत तज्ज्ञ आहारात असे काही बदल करण्याचे सुचवतात, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येईल.

कार्बोहायड्रेट युक्त पदार्थांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर सर्वात लक्षणीय परिणाम होतो. कारण कार्बोहायड्रेट्स ग्लुकोजमध्ये मोडतात आणि रक्तप्रवाहात शोषले जातात. यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी खूप वाढते. त्यामुळे त्यांना मर्यादित प्रमाणात कार्बोहायड्रेट युक्त गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत ते जाणून घेऊया.

ब्रोकली- ब्रोकलीमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि के असते. ब्रोकलीचा GI (ग्लायसेमिक इंडेक्स) फक्त 10 आहे. 

टोमॅटो - टोमॅटोमध्ये क्रोमियम आढळते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मधुमेही रुग्णांसाठी टोमॅटो फायदेशीर मानले जातात. 

फ्रोजन मटार- यात पोटॅशियम, लोह आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. फ्रोजन मटारचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, असे म्हणतात,

गाजर - कच्च्या गाजराचे GI 14 जे खूप कमी असते, परंतु जर ते उकडलेले असेल तर ते 41 पर्यंत वाढू शकते. त्यात फार कमी स्टार्च आढळते. मधुमेहासाठी गाजर फायदेशीर आहे. 

रताळे- प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी रताळ्यामध्ये आढळतात. रताळ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, असे म्हणतात. 

या व्यतिरिक्त, आर्टिचोक, शतावरी, फुलकोबी, हिरव्या बीन्स, लेट्यूस, वांगे, मिरची, मँगो टाउट, पालक आणि अजवाइन आपल्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकते.

Web Title: Diabetes: 15 vegetables that control blood sugar level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.