ब्लड शुगर नॅचरलपणे होईल कमी, नियमितपणे करा 'हा' एक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:32 AM2024-02-05T10:32:42+5:302024-02-05T10:35:04+5:30

डायबिटीस 2 प्रकारचा असतो. एक टाइप 1 आणि दुसरा टाइप 2. त्यासोबत काही महिलांना गर्भावस्थेत डायबिटीसचा सामना करावा लागतो. 

Diabetes blood sugar : Sugar level will be controlled without medicines eat methi or fenugreek daily | ब्लड शुगर नॅचरलपणे होईल कमी, नियमितपणे करा 'हा' एक उपाय

ब्लड शुगर नॅचरलपणे होईल कमी, नियमितपणे करा 'हा' एक उपाय

डायबिटीस एक अशी समस्या आहे ज्यात शरीरात एकतर योग्य प्रमाणात इन्सुलिन बनत नाही किंवा जे इन्सुलिन बनतं त्याचा प्रभावी उपयोग होत नाही. अशात ब्लड शुगर लेव्ह वाढू लागते. डायबिटीस 2 प्रकारचा असतो. एक टाइप 1 आणि दुसरा टाइप 2. त्यासोबत काही महिलांना गर्भावस्थेत डायबिटीसचा सामना करावा लागतो. 

डायबिटीसचे प्रकार

टाइप 1 डायबिटीस - टाइप 1 डायबिटीस कोणत्याही वयात होऊ शकतो. हा लहान मुलं किंवा तरूणांमध्ये आढळतो. हा एक ऑटोइम्यून आजार आहे. यात शरीर इन्सुलिन तयार करणं बंद करतं. म्हणजे शऱीरातील कोशिका इन्सुलिन तयार करणाऱ्या अग्नाशयाच्या कोशिकांवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. 

टाइप 2 डायबिटीस - टाइप 2 डायबिटीस होण्याची अनेक कारणं आहेत. याचं एक मुख्य कारण आहे लठ्ठपणा, तसेच हायपरटेंशन आणि खराब लाइफस्टाईल. यात शरीर एकतर इन्सुलिन कमी तयार करतं किंवा शरीरातील कोशिका इन्सुलिनप्रति संवेदनशील नसतात. टाइप 2 डायबिटीस जास्तकरून वयस्क लोकांना होतो. 

कशाने कमी होतो डायबिटीस?

अशात तुम्ही जर टाइप 2 डायबिटीसचे रूग्ण असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा पदार्थाबाबत सांगणार आहोत ज्याचं सेवन करून ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. आम्ही सांगतोय मेथीबाबत. मेथीच्या बियांनी ब्लड शुगर लेव्हल कमी केली जाऊ शकते. मेथीच्या बियांमध्ये फायबर आणि इतर रसायन असतात जे हळूवार पचन करण्यात मदत करतात. याने शरीरातील कार्बोहायड्रेट आणि शुगरही कमी होते. मेथीच्या बियांचं सेवन केल्याने शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. काही रिसर्चमध्ये मेथीला जास्त फायदेशीर मानलं आहे.

कसा केला रिसर्च?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, डायबिटीसच्या उपचारासाठी मेथीची टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये मेथीच्या चपातीचा वापर करण्यात आला होता आणि बघितलं गेलं की, कशाप्रकारे मेथी डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. यात आढळून आलं की, मेथीची चपाती खाल्ल्याने शरीरात कार्बोहायड्रेटचं अवशोषण कमी होतं. यासाठी डायबिटीसच्या काही रूग्णांना चपात्यांचे दोन तुकडे देण्यात आले ज्यात 5 ग्रॅम मेथी होती. मेथीची चपाती खाल्ल्यानंतर सतत 4 तास या लोकांच्या ब्लड शुगर लेव्हल आणि इन्सुलिनची टेस्ट करण्यात आली.

तसेच आणखी एक टेस्ट करण्यात आली. ज्यात डायबिटीसच्या रूग्णांना एक आठवडा नॉर्मल चपाती दिली आणि एक आठवडा  मेथीची चपाती दिली. रिसर्चमधून समोर आलं की, मेथीची चपाती खाल्ल्याने या लोकांच्या इन्सुलिन आणि ग्लूकोजमध्ये बदल झाला. यात आढळलं की, मेथीची चपाती इन्सुलिन रेजिस्टेंस कमी करण्यासाठी फायदेशीर असते.

अशात आढळलं की, खाण्यात मेथीचा वापर केल्याने इन्सुलिन रेजिस्टेंस कमी केला जाऊ शकतो. ज्याने टाइप 2 डायबिटीसची समस्या ठीक होऊ शकते. अशाच प्रकारच्या एका दुसऱ्या रिसर्चमध्ये आढळलं की, 10 ग्रॅम मेथीच्या बियांना कोमट पाण्यात भिजवून ठेवून ते पाणी प्यायले तर टाइप 2 डायबिटीस कंट्रोल केला जाऊ शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, मेथीच्या बिया ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करू शकतात. 

Web Title: Diabetes blood sugar : Sugar level will be controlled without medicines eat methi or fenugreek daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.