दिवाळीत मिठाई आणि फराळ तुमचा डायबिटीस करेल अतिगंभीर, वेळीच फॉलो करा या सोप्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 02:37 PM2021-11-04T14:37:42+5:302021-11-04T14:38:00+5:30
मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ केले जातात आणि खाल्ले जातात. पण अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांसमोर सर्वात मोठी समस्या उभी राहते. जास्त गोड खाणे त्यांच्यासाठी घातक ठरते. दिवाळीमध्ये मधुमेही रूग्णांनी काही खास टिप्स फाॅलो करून साखर नियंत्रणात ठेवली पाहिजे.
दिवाळी हा वर्षातील मोठा सण आहे. याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. त्यासाठी अनेक दिवस आधीच तयारी सुरू होते. घर स्वच्छ करण्यापासून विविध प्रकारच्या मिठाई आणि पदार्थ बनवण्यापर्यंतची प्रक्रिया सुरू असते. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ केले जातात आणि खाल्ले जातात. पण अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांसमोर सर्वात मोठी समस्या उभी राहते. जास्त गोड खाणे त्यांच्यासाठी घातक ठरते. दिवाळीमध्ये मधुमेही रूग्णांनी काही खास टिप्स फाॅलो करून साखर नियंत्रणात ठेवली पाहिजे.
गूळ वापरा
तोंड गोड करण्यासाठी साखरच खावी असे नाही. त्याऐवजी तुम्ही गूळ वापरूनही काही गोष्टी तयार करू शकता. गुळापासून बनवलेले गोड पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे गूळ घालून काही मिठाई घरीच बनवा. मधुमेही रुग्ण या गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खाऊ शकतात.
शुगर फ्री मिठाई
तुम्ही खीर, फिरनी किंवा इतर काही मिठाईसाठी शुगर फ्री वापरू शकता. तुम्ही स्वतःसाठी स्वतंत्रपणे काही शुगर फ्री मिठाई देखील बनवू शकता. पण बाजारातील शुगर फ्री मिठाई खाणे टाळा.
सुकामेवा आणि स्नॅक्स
सणाचा आनंद फक्त मिठाईनेच घेतला पाहिजे असे नाही. या दरम्यान तुम्ही स्नॅक्स किंवा सुकामेवा खाऊन सणाचा आनंद घेऊ शकता. याशिवाय तुम्ही इतर स्नॅक्स पदार्थ खाऊ शकता.
पाणी प्या
सणाच्या काळात लोक सामान्य दिवसांपेक्षा जास्त जड अन्न खातात. ते पचवण्यासाठी पाणी नीट प्यावे लागते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवा.
थोडे खा
एकाच वेळी खूप काही खाण्याऐवजी दिवसभर थोडे थोडे खावे. यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जाही मिळेल.
नियमित चालणे
मधुमेहाच्या रुग्णांसाठी नियमित चालणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात अति खाण्याचं संतुलन राखण्यासही मदत होईल. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी किमान एक तास तरी चालावे