पायांच्या रोजच्या दुखण्याला जबाबदार आहे 'हा' आजार, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 11:30 AM2020-01-08T11:30:59+5:302020-01-08T11:33:52+5:30
कामाच्या व्यापात व्यस्त असलेल्या प्रत्येक महिला आणि पुरूषांना पाय दुखण्याची समस्या जाणवत असते.
कामाच्या व्यापात व्यस्त असलेल्या प्रत्येक महिला आणि पुरूषांना पाय दुखण्याची समस्या जाणवत असते. त्याचे कारण वेगवेगळे असू शकते. अनेक आजारांचा परिणाम पायांच्या स्नायूंवर होत असतो. भारतात खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये झालेला बदलामुळे कमी वयात लोक डायबिटीसचे शिकार होत आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे अनेकांना हे कळतंच नाही की, त्यांना डायबिटीस आहे. पण याच आजारामुळे आपल्या हातपायांना मोठी किंमत मोजावी लागू शकते. नकळतपणे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
डायबिटीसच्या रूग्णांमध्ये जर रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त काळासाठी वाढलेलं असेल तर ही गोष्ट त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. हीच परिस्थिती जर जास्तवेळ राहिली तर जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसंच हे आजार हृदयासंबंधी सुद्धा असू शकतात. यामुळे तुमचे पाय सुन्न होतात. हालचाल करण्यासाठी सुद्धा समस्या जाणवते. डायबिटीस हा आजार तुमच्या पायांना घातक ठरू शकतो. त्यामुळे पायांची गंभीर समस्या उद्भवू शकते.
जर प्रमाणापेक्षा जास्त डायबिटिसचा धोका वाढला असेल तर रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. डायबिटीसमुळे तुमच्या पायांचे नर्व्स खराब होतात. त्यामुळे तळपायांना थंड घाम येतो. तसंच उष्णतेचे प्रमाण कमी होते. त्यासोबतच पाय दुखण्याची समस्या तीव्रतेने जाणवते. शरीरातील संवेदनशीलता संपत असेल तर त्या स्थितीला डायबेटिक न्यूरॉपेथी असं म्हणतात. न्यूरॉपेथीमुळे पायांमध्ये जर काही जखम किंवा फोडं आल्यास त्याची जाणीव तुम्हाला होत नसेल तर अशा परिस्थितीत इन्फेक्शन वाढण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे इन्फेक्शन पसरून मोठ्या जखमेत याचं रुपांतर होऊ शकतं. कारण पायांचे मसल्स त्यावेळी इन्फेक्टेड झालेले असतात. तिथल्या पेशी आणि मांस हे व्यवस्थित काम करत नाहीत.
डाटबिटिस फक्त शरीराच्या अवयवांवर प्रभाव टाकत नाही. तर त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुध्दा प्रभावित होत असतो. रक्तप्रवाह कमी असल्यामुळे शरीरावर झालेली जखम भरण्यासाठी वेळ लागत असतो. त्यामुळे हात आणि पायांमधला रक्तप्रवाह कमी होऊन पेरिफेरल वैस्कुलर डिजीज होण्याची दाट शक्यता असते. भारतातील सर्वाधिक लोक या समस्येचा सामना करत आहेत. यामुळेच अल्सर आणि गैंगरीनची समस्या उद्भवते.
डायबिटिसमुळे पायांना होणारे इन्फेक्शन
डायबिटिसमुळे पायांना वेगवेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन होत असतं. त्यामुळे फंगल इंफेक्शन, एथलीट फूट, सेल्युलस, कॉर्न्स, फफोले, बनियन, ड्राई स्किन, डायबीटिक अल्सर, अंगठे वाकडे होणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. तसंच आतल्या भागात टॉन्सिलचीचा त्रास होऊ शकतो. या समस्यांपासून लांब राहायचं असल्यास काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. यावर उपाय म्हणून डायबिटीस असलेल्या लोकांनी आपल्या शरीरासंबंधी आणि आरोग्यासंबंधी तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.