पायांमधून दुर्गंधी येणं किडनी-डायबिटीसारख्या या 6 आजारांचा असू शकतो संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 09:31 AM2023-01-23T09:31:17+5:302023-01-23T09:31:48+5:30
पायांमधून दुर्गंधी तेव्हा येते जेव्हा पायांना घाम येतो. हा घाम शूज आणि सॉक्समध्ये चिकटून असलेल्या बॅक्टेरियासोबत मिक्स होतो. त्यानंतर एक दुर्गंधी येणारं अॅसिड तयार होतं. ज्यामुळे दुर्गंधी येते.
जर तुमच्या पायातून घाणेरडा वास येत असेल तर या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका किंवा ही समस्या हलक्यात घेऊ नका. कारण ही समस्या घाणेरडे सॉक्स घातल्याने किंवा शूज घातल्यानेच होते असं नाही. हा तुमच्या शरीरात अनेक गंभीर रोग वाढत असल्याचाही संकेत आहे. हा डायबिटीस किंवा किडनीचा आजार असण्याचाही संकेत असू शकतो. wales.nhs.uk च्या एका रिपोर्टनुसार, पायांमधून खूप वास येण्याला मेडिकल भाषेत ब्रोमोडोसिस ( Bromodosis) म्हटलं जातं.
पायांमधून दुर्गंधी तेव्हा येते जेव्हा पायांना घाम येतो. हा घाम शूज आणि सॉक्समध्ये चिकटून असलेल्या बॅक्टेरियासोबत मिक्स होतो. त्यानंतर एक दुर्गंधी येणारं अॅसिड तयार होतं. ज्यामुळे दुर्गंधी येते. काही लोकांच्या पायांच्या घामामध्ये प्रोपियोनिक अॅसिड असतं, जे प्रोपियोनी बॅक्टेरियाद्वारे अमीनो अॅसिडच्या ब्रेकडाउननंतर तयार होतं. जे पायातून वास येण्यास कारणीभूत ठरतं. पण पायातून वास येण्याचं हेच एक कारण नाहीये.
हाइपरहाइड्रोसिस आहे मोठं कारण
तुमच्या पायातून जेवढा जास्त घाम येणार त्यातून तेवढा जास्त वास येणार. जास्त घाम येण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत हाइपरहाइड्रोसिस म्हटलं जातं. हे जास्त फिजिकल अॅक्टिविटीचं कारण नाही तर एक आजार आहे. ज्यावर उपचार करता येतात. याचे दोन प्रकार असतात. प्रायमरी फोकल हाइपरहाइड्रोसिस आणि सेकेंडरी फोकल हायपरहायड्रोसिस.
प्राइमरी फोकल हायपरहाइड्रोसिस काय आहे?
भयंकर घाम येण्याचं कारण बनणाऱ्या फोकल हाइपरहाइड्रोसिसचं मूळ कारण स्पष्ट नाही. त्यामुळे जर स्वच्छता करूनही तुमच्या पायांमधून वास येत असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांना संपर्क केला पाहिजे.
सेकेंडरी फोकल हाइपरहाइड्रोसिस
मेडिकल न्यूज टुडेच्या एका रिपोर्टनुसार, अशाप्रकारच्या हाइपरहाइड्रोसिसचे अनेक कारणे असू शकतात. मुळात हा अनेक गंभीर आजारांचं कारण आहे. असं मानलं जातं की, पायांमधून येणाऱ्या दुर्गंधीकडे दुर्लक्ष करू नये. कारण हा संकेत याचा आहे की, तुमच्या शरीरात गंभीर आजार वाढत आहे. त्यातील काही आजार खालील प्रमाणे असू शकतात.
1) डायबिटीस
2) थायरॉइड
3) नर्वस सिस्टम डिसऑर्डर
4) फंगल इन्फेक्शन
5) लो ब्लड शुगर
6) मेनोपॉज हॉट फ्लाशेस
7) इतकंच काय तर किडनीच्या काही आजारांमध्ये जेव्हा रक्तात अतिरिक्त यूरिया तयार होणं सुरू होतं. तेव्हा पायांमधून वास येणारा घाम तयार होतो.
काय करावा उपाय?
- आपल्या डाएटमध्ये वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सचा समावेश करा.
- स्वच्छतेची काळजी घ्या, दिवसातून कमीत कमी दोन वेळा पाय धुवावे.
- कॉटनचे सॉक्स वापरा, पाय कोरडे ठेवा, शूज घालण्याआधी त्यात थोडं पावडर टाका.