डायबिटीसचं हे आहे सगळ्यात कॉमन लक्षण, दिसताच लगेच डॉक्टरांना भेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 10:44 AM2023-12-04T10:44:27+5:302023-12-04T10:45:14+5:30
Diabetes Symptoms : डायबिटीसचे दो मुख्य प्रकार असतात. टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीस. यात टाइप 2 डायबिटीसचे सगळ्यात जास्त रूग्ण असतात.
Diabetes Symptoms : डायबिटीस आज भारतासोबतच जगभरात एक गंभीर आजार बनला आहे. डायबिटीसच्या सगळ्या केसेसमध्ये ब्लड स्ट्रीममध्ये शुगर तयार होऊ लागते. कारण अग्नाशय पुरेसं इन्सुलिनचं उत्पादन करत नाही. डायबिटीसचे दो मुख्य प्रकार असतात. टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीस. यात टाइप 2 डायबिटीसचे सगळ्यात जास्त रूग्ण असतात. नुकतीच एक्सपर्टने माहिती दिली की, डायबिटीसचं कॉमन लक्षण डोळ्यामध्ये दिसू शकतं.
द मिररनुसार, जर तुम्हाला धुसर दिसत असेल, जर बरोबर दिसत नसेल तर हे डायबिटीसचं लक्षण असू शकतं. डायबिटीस मेलेटस किंवा केवळ डायबिटीसच्या कारणामुळे व्यक्तीची ब्लड शुगर लेव्हल फार जास्त वाढते.
धुसर दिसू लागतं
इन्सुलिन रक्तातून ग्लूकोजला बाहेर आणि कोशिकांमध्ये नेण्यासाठीचं एक महत्वाचं हार्मोन आहे. डायबिटीसने पीडित लोक एकतर पुरेसं इन्सुलिनचं उत्पादन करण्यात असमर्थ असतात किंवा त्याबाबत प्रतिरोध करतात. डायबिटीसमुळे ब्लड शुगरची हाय लेव्हल तुमच्या स्पष्ट दिसण्याच्या क्षमतेला प्रभावित करते. ज्यामुळे तुमच्या डोळ्याच्या आता लेन्समध्ये सूज किंवा स्त्राव होऊ शकतो. ज्यामुळे स्पष्ट दिसत नाही.
हे फार कमी ब्लड शुगर लेव्हलमुळे होऊ शकतं. पण जशी शुगरची लेव्हल स्थिर होते किंवा सामान्य रेंजवर परत येते तेव्हा दृष्टी सामान्य होते.
जर तुम्हाला अचानक धुसर दिसू लागत असेल तर तुम्ही वेळीच डोळ्यांची टेस्ट करावी. डॉक्टरांनुसार उपचार घ्यावे. यात फार चिंता करण्याची गरज नाही. कमी दिसणं मोतिबिंदू, मायग्रेन आणि वयासंबंधी डोळ्यांच्या समस्येचं कारण असू शकते.