Diabetes tips: कितीही गोड खा! डायबिटीस वाढणार नाही जर केलंत 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 05:35 PM2022-06-26T17:35:12+5:302022-06-26T18:01:17+5:30

आज आम्ही तुम्हाला अशी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही गोड पदार्थ झाल्यानंतरही तुमची शुगर (Sugar Level) वाढणार नाही.

diabetes patient after eating sweet can walk for 10 minutes to reduce the sugar | Diabetes tips: कितीही गोड खा! डायबिटीस वाढणार नाही जर केलंत 'हे' काम

Diabetes tips: कितीही गोड खा! डायबिटीस वाढणार नाही जर केलंत 'हे' काम

googlenewsNext

गोड पदार्थ खाणं कोणाला नाही आवडत. भारतीय लोक तर सगळ्या कमाल चवीच्या पदार्थांचे शौकीन असतात. जसे की, खूप तिखट, आंबट आणि गोड. मात्र प्रमाणापेक्षा जास्त गोड पदार्थ खाल्याने (Eating Too Much Sweets) कोणालाही त्रास होऊ शकतो. डायबिटीज असलेल्या लोकांना (Diabetic People) तर साखर खाऊच दिली जात नाही. कारण यामुळे त्यांची रक्तातील शुगर वाढण्याचा धोका असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही गोड पदार्थ झाल्यानंतरही तुमची शुगर (Sugar Level) वाढणार नाही.

अमेरिकन न्यूट्रिशनिस्ट कॉरी एल रॉड्रिग्ज (American Nutritionist Corey L. Rodriguez) यांनी डायबिटीज नियंत्रित करण्याचा एक सोपा मार्ग सांगितला आहे. दररोज जेवण झाल्यानंतर केवळ दहा मिनिटे चालणे हे डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी (Diabetes Tips) फायदेशीर ठरू शकते. असे त्यांचे मत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही जास्त साखर असलेले जेवण केले असेल, म्हणजेच ज्या अन्नात साखरेचे प्रमाण जास्त असेल अशा पदार्थांचे सेवन केले असेल, तर तुम्ही जेवल्यानंतर फक्त 10 मिनिटेच फिरायला जावे.

हे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास आणि अन्नातून अतिरिक्त ग्लुकोज वापरण्यास मदत करू शकते. न्यूट्रिशनिस्टचे म्हणणे आहे की जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या स्नायूंना तुमच्या रक्तातून अतिरिक्त ग्लुकोज काढण्यास मदत होते.

जेवल्यानंतर चालणे (Walking After Meal) हे सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी डायबिटीजचे रुग्ण असाल तर जेवल्यानंतर काही वेळ चालणे आवश्यक आहे. असे त्यांचे मत आहे. हे केवळ पचन आरोग्यासाठी चांगले नाही तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचादेखील हा एक चांगला मार्ग आहे.

Web Title: diabetes patient after eating sweet can walk for 10 minutes to reduce the sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.