डायबिटीसच्या रुग्णांनी मधाचे सेवन करावे की करु नये? जाणून घ्या याचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 03:29 PM2022-10-02T15:29:14+5:302022-10-02T15:41:46+5:30
मधुमेहामध्ये मधाचे सेवन काही विशिष्ट परिस्थितीत पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. मधामध्ये असलेले एंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्याबद्दल जाणून घेऊया.
मधुमेह म्हणजे शरीरात रक्तातील ग्लुकोज किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, आजकालच्या धकाधकीच्या आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे बहुतेक लोक मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहेत. मधुमेही रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कार्बोहायड्रेट्ससह साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत अनेक मधुमेही रुग्ण चहा किंवा कॉफीमध्ये मध घालून मध सेवन करतात, परंतु मधुमेहामध्ये मध वापरणे सुरक्षित आहे का? आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, मधुमेहामध्ये मधाचे सेवन काही विशिष्ट परिस्थितीत पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. मधामध्ये असलेले एंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्याबद्दल जाणून घेऊया.
मधाचे पौष्टिक मूल्य:
Healthline.com च्या मते, मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम, फोलेट आणि पोटॅशियम यांसारखे इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. आरोग्यासाठी खूप फायदे देण्याबरोबरच हे कमकुवत पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास देखील उपयुक्त आहे.
मधुमेहामध्ये मधाचे सेवन:
मध एक नैसर्गिक स्वीटनर आहे, परंतु तरीही मधामध्ये कॅलरी, साखर आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. तथापि, जर मधाची साखर किंवा इतर साखर पर्यायांशी तुलना केली तर मधाचा रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप कमी परिणाम होतो. तसा मध आरोग्यासाठी फायदेशीर आहे, म्हणूनच डॉक्टर काही प्रमाणात मधुमेहाच्या रुग्णांना याचा वापर करण्यास परवानगी देतात.
मधुमेहाच्या रुग्णांनी मधाचे सेवन करावे का?
- पांढर्या साखरेपेक्षा मध गोड असतो, हे लक्षात ठेवावे. म्हणूनच तो कमी प्रमाणात वापरायचा आहे.
- जर तुमची साखरेची पातळी खूप जास्त असेल तर तुम्ही मध खाणे टाळावे.
- मध खरेदी करताना त्याच्या शुद्धतेची काळजी घ्या, कारण आजकाल बाजारात साखरेच्या पाकातील मध विकला जातो.
- मध घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.