डायबिटीसच्या रुग्णांनी जेवणात सेवन करा 'हे' पदार्थ, ठरेल भरपूर फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 03:15 PM2022-03-23T15:15:52+5:302022-03-23T15:22:48+5:30

आज आपण डायबेटीजच्या रुग्णांच्या दुपारच्या जेवणाच्या आहाराबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांसाठी जेवणाच्या ताटात काय समाविष्ट करावे. (The Best Foods for diabetic patients)

diabetes patient should eat these food | डायबिटीसच्या रुग्णांनी जेवणात सेवन करा 'हे' पदार्थ, ठरेल भरपूर फायदेशीर

डायबिटीसच्या रुग्णांनी जेवणात सेवन करा 'हे' पदार्थ, ठरेल भरपूर फायदेशीर

googlenewsNext

मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी जीवनशैलीसोबतच आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही थोडासाही निष्काळजीपणा केला तर ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. मधुमेही रुग्णांनी (diabetic patients) कोणत्या गोष्टींचे सेवन करावे आणि कोणत्या गोष्टी त्यांच्या आरोग्यावर परिणाम करु शकतात हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण डायबेटीजच्या रुग्णांच्या दुपारच्या जेवणाच्या आहाराबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांसाठी जेवणाच्या ताटात काय समाविष्ट करावे. (The Best Foods for diabetic patients)

धान्य आणि कडधान्य (grains and lentils)
मधुमेहाच्या रुग्णांनी दुपारच्या जेवणात संपूर्ण धान्य आणि कडधान्यांचा समावेश करावा. याचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना पोटॅशियम, फायबर सारखे अनेक आवश्यक पोषक तत्व मिळतात.

हिरव्या पालेभाज्या (green vegetables)
डायबिटीजच्या रुग्णांनी आपल्या आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. उदाहरणार्थ, तुम्ही मेथी, पालक, कारले आणि दुधी यांचे सेवन करू शकता. या सर्व भाज्यांमध्ये कमी कॅलरीज आणि अधिक पोषकतत्व असतात. याव्यतिरिक्त, त्यात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी असतात.

दही (curd)
दही खायला सर्वांनाच आवडते. जेवणाच्या ताटात दही दिसले तर खाण्याचा आनंद द्विगुणित होतो. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेषतः डायबिटीज रुग्णांसाठी (Diabetic patients) फायदेशीर मानले जाते. आपण ते दुपारच्या जेवणात समाविष्ट केले पाहिजे. यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यासोबतच यामध्ये CLA आढळते, जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. याशिवाय हे वजन कमी करण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

Web Title: diabetes patient should eat these food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.