Health tips: डायबिटीसच्या रुग्णांनी बेलफळाच्या ज्युस प्यावा का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 02:05 PM2022-05-11T14:05:30+5:302022-05-11T14:07:14+5:30

बेलफळ हे शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते. उन्हाळ्यात बेलफळाचं ज्युस पितात. पण हे ज्युस डायबिटीस असलेल्या पेशंटनी प्यावे का?

diabetes patient should not drink bael juice | Health tips: डायबिटीसच्या रुग्णांनी बेलफळाच्या ज्युस प्यावा का? जाणून घ्या सत्य

Health tips: डायबिटीसच्या रुग्णांनी बेलफळाच्या ज्युस प्यावा का? जाणून घ्या सत्य

googlenewsNext

उन्हाळा म्हटलं की थंडगार ज्युसेस पिण्याकडे सर्वांचा कल असतो. उन्हाच्या काहीलीत शरीराला गारवा देणारे हे ज्युसेस चविष्टही असतात. अनेक फळांपासून ज्युसेस तयार होतात. पण मग ही सर्वच फळं ज्युस बनवून पिण्यायोग्य असतात का? काही ज्युसेस विशिष्ट आजार असणाऱ्या लोकांना चालत नाहीत. मग अशावेळी हे ज्युसेसे प्यावेत का असा प्रश्न निर्माण होतो?

बेलफळ हे शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते. उन्हाळ्यात बेलफळाचं ज्युस पितात. पण हे ज्युस डायबिटीस असलेल्या पेशंटनी प्यावे का? त्याआधी जाणून घ्या की बेलफळात काय गुणधर्म असतात. 

बेलफळातील गुणधर्म
बेलफळात व्हिटॅमिन सी, फायबर, लोह, कॅल्शियम, गुड फॅट, फॉस्फरस आदी घटक असतात. हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. बेलफळाच्या ज्युसमुळे जुलाब, पित्त हे आजार दुर होतात. मात्र याचं एका दिवसात जास्त सेवन झालं तर शरीरासाठी हे अत्यंत घातक आहे.

डायबिटीसच्या रुग्णांनी बेलफळाचा ज्युस प्यावा का?
डायबिटीसच्या रुग्णांनी बेलफळाचा ज्युस पिऊ नये कारण, बेलफळाच्या ज्युसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल याचे अधिक प्रमाणात सेवन धोकादायक ठरु शकते. यामुळे रक्तातील साखर वाढु शकते. बेलफळाचा ज्युस पिण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: diabetes patient should not drink bael juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.