मधुमेह रुग्णांनी दुधातसोबत 'या' गोष्टी घ्या, बघा कसा चटकन फरक जाणवेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 02:32 PM2021-06-13T14:32:05+5:302021-06-13T14:33:08+5:30
जर तुम्हाला डायबेटीस असेल तर दुध हे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया दूधासोबत अशा कोणत्या गोष्टींचे सेवन तुम्ही करू शकता ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील.
तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेली तर मधुमेह हा आजार होतो. या आजारामुळे तुम्हाला अनेक इतर आजारांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळेच डायबेटीसच्या रुग्णांनी त्यांच्या एकंदर जीवनशैलीची काळजी घेणे खुप गरजेचे असते. जर तुम्हाला डायबेटीस असेल तर दुध हे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया दूधासोबत अशा कोणत्या गोष्टींचे सेवन तुम्ही करू शकता ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अबरार मुल्तानी यांनी झी न्युज हिंदीच्या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीच्या मते, नाश्त्यात दूध सेवन केल्यास टाईप २ डायबेटीसच्या रुग्णांना भरपूर फायदा होतो. दुधाचे सेवन केल्याने कर्बोदकांचे पचन आणि रक्तातील साखर कमी होते.
मधुमेहग्रस्त रूग्णांनी अशा प्रकारे करावे दुधाचे सेवन
दालचिनीयुक्त दूध
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी म्हणतात की, दालचिनी युक्त दूध डायबेटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे, कारण दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते. यात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे मधुमेह नियंत्रित करण्यात मदत करतात. दूध आणि दालचिनीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. यासह, यात बीटा कॅरोटीन, अल्फा कॅरोटीन, लायकोपीन आणि ल्युटीन देखील आहेत. या मिश्रणातील अँटिऑक्सिडेंट्स जे रक्तातील साखर कमी करण्यास उपयुक्त ठरतात आणि त्याद्वारे संक्रमणाचा धोका कमी करतात.
बदाम दूध
डायबेटीसच्या रुग्णांसाठी बदामाचे दूध अत्यंत फायदेशीर आहे. बदामाचे दूध तुम्ही घरी देखील बनवू शकता. बदामाच्या दुधात कॅलरी कमी असतात आणि त्यात व्हिटामिन डी, ई आणि आवश्यक पोषक घटक असतात. त्यात प्रथिने आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात आढळतात, जे रक्तामध्ये ग्लुकोज जलदपणे शोषू देत नाही.
हळद दूध
हळद दूधही मधुमेह रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन असते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी याचा मर्यादित वापर चांगला ठरतो.