डायबिटीसच्या रूग्णांना 'या' जीवघेण्या आजाराचा अधिक धोका, नव्या रिसर्चमधून खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 10:12 AM2019-05-21T10:12:23+5:302019-05-21T10:16:50+5:30
एकदा जर डायबिटीस झाला तर त्यासोबत इतरही अनेक आजारांचा धोका वाढतो. आता तर ही बाब एका रिसर्चमधूनही समोर आली आहे.
(Image Credit : Medical News Today)
डायबिटीस हा आजार बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे अनेकांना आपल्या जाळ्यात घेत आहे. पूर्वी हा आजार केवळ अधिक वयाच्या लोकांनाच होतो, असा समज होता. पण आता तर तरूण लोकही या आजाराचे शिकार होत आहेत. असे म्हणतात की, एकदा जर डायबिटीस झाला तर त्यासोबत इतरही अनेक आजारांचा धोका वाढतो. आता तर ही बाब एका रिसर्चमधूनही समोर आली आहे. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, टाइप-२ डायबिटीसने पीडित रुग्णांमध्ये लिव्हरशी निगडीत २ आजार लिव्हर सिरॉसिस आणि लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो.
१ कोटी ८० लाख लोकांवर अभ्यास
बीएमसी मेडिसिन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, यूरोपच्या डायबिटीक रूग्णांची जेव्हा लेटर स्टेजमध्ये टेस्ट केली गेली, तेव्हा लिव्हरशी संबंधित आजारांमुळे मृत्यूची आकडेवारी फार जास्त आढळली. या रिसर्चमध्ये यूरोपमधील १ कोटी ८० लाख डायबिटीसने पीडित लोकांचा समावेश करण्यात आला होता. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, डायबिटीसने पीडित रूग्णांनी या जीवघेण्या आजारांना टाळण्यासाठी आपल्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे.
प्रत्येक ६ पैकी १ व्यक्तीत गंभीर असते NAFLD
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज (NAFLD) पाश्चिमात्य देशातील एक चतुर्थांश लोकांना प्रभावित करते आणि हा लिव्हरशी संबंधित जगातला सर्वात कॉमन आजार आहे. लिव्हरशी संबंधित हा आजार लठ्ठपणा आणि टाइप २ डायबिटीसने फार खोलवर संबंध असलेला आहे. तसा तर NAFLD हा आजार नुकसानकारक नाही, पण प्रत्येक ६ पैकी एका व्यक्तीमध्ये हा आजार गंभीर रूप घेतो. ज्यामुळे लिव्हर इंज्युरी, लिव्हर सिरॉसिक, लिव्हर फेलिअर आणि लिव्हर कॅन्सरचाही धोका असतो.
(Image Credit : lifealth.com)
डोळे, किडनी, हार्टसोबतच लिव्हरवर नजर ठेवण्याची गरज
या रिसर्चमधील एक अभ्यासक नवीद सत्तर म्हणाले की, 'डायबिटीसने पीडित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना खूपसाऱ्या गोष्टींची टेस्ट करणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज असते. जसे की, डोळे, किडनी, हार्ट रिस्क. पण या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, लिव्हरकडेही दुर्लक्ष करू नये, नाही तर लिव्हरशी संबंधित आजारांचा धोका अधिक राहतो. सोबतच डायबिटीसच्या रूग्णांनी अल्कोहोल सेवन करणे आणि वजन कमी करण्याकडेही अधिक लक्ष दिलं पाहिजे'.