डोळ्यांमध्येही दिसतात डायबिटीसचे हे संकेत, यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 09:17 AM2023-02-22T09:17:53+5:302023-02-22T09:19:28+5:30

Diabetes Warning Signs : डायबिटीसच्या रूग्णांमध्ये पॅंक्रियाज किंवा इन्सुलिनचं उप्तादन फार कमी होतं किंवा होतच नाही. इन्सुलिन एक हार्मोन आहे जो ग्लूकोजला शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देतो.

Diabetes symptoms : Eyes test could help to detect diabetes | डोळ्यांमध्येही दिसतात डायबिटीसचे हे संकेत, यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

डोळ्यांमध्येही दिसतात डायबिटीसचे हे संकेत, यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

googlenewsNext

Diabetes Warning Signs : आजच्या जगात डायबिटीस एक सामान्य आजार बनत चालला आहे आणि याचे सगळ्यात जास्त रूग्ण भारतात आहेत. भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. हा एक असा आजार आहे जो रूग्णासोबत त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहतो. या आजाराची अनेक कारणे आहेत, जसे की, अनहेल्दी लाइफस्टाईल, शारीरिक हालचाल न करणे, जेनेटिक्स, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर इत्यादी.  

डायबिटीसच्या रूग्णांमध्ये पॅंक्रियाज किंवा इन्सुलिनचं उप्तादन फार कमी होतं किंवा होतच नाही. इन्सुलिन एक हार्मोन आहे जो ग्लूकोजला शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देतो. या आजाराच्या रूग्णाला आपली शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवावी लागते. 

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना माहीत नाही की, त्यांना डायबिटीस आहे. डायबिटीस झाल्यावर व्यक्तीला वेगवेगळे संकेत मिळतात, जसे की, पुन्हा पुन्हा लघवी लागणे, जास्त तहान, सतत भूक लागणे इत्यादी. तसेच डोळ्यांवरूनही डायबिटीसचे संकेत मिळतात. तेच आम्ही सांगणार आहोत.

मोतिबिंदू

वेळेआधीच मोतिबिंदूची समस्या डायबिटीसचा संकेत असू शकतो. डायबिटीसच्या रूग्णांमध्ये ही समस्या वेळेआधीच दिसू लागते. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर ही समस्या वाढू शकते.

धुसर दिसणे

धुसर दिसणे हा डायबिटीसचा एक संकेत असू शकतो. जर तुम्हाला डोळ्यात ही समस्या जाणवत असेल तर लगेच डायबिटीसची टेस्ट करा. शुगर लेव्हल कंट्रोल करून ही समस्या ठीक केली जाऊ शकते.

डायबिटीक रेटिनोपॅथी

ही एक अशी समस्या आहे जी शुगरने पीडित व्यक्तीच्या रेटिनाला प्रभावित करते. ही स्थिती तेव्हा होते जेव्हा रेटिनापर्यंत रक्त पुरवणाऱ्या नसा डॅमेज होतात. जर वेळीच यावर उपचार केला नाही तर दृष्टीही जाऊ शकते.

ग्लूकोमा

या समस्येत डोळ्यांच्या बाहेर तरल पदार्थ निघत नाहीत. ज्यामुळे डोळ्यांवर दबाव पडतो. याने डोळ्यांच्या ब्लड सेल्स आणि नसांचं नुकसान होतं. ज्यामुळे बघण्यात अडचण येऊ शकते.

Web Title: Diabetes symptoms : Eyes test could help to detect diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.