Diabetes Symptoms : डायबिटीसची अशी 5 लक्षणं, जी फक्त डॉक्टरच ओळखू शकतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 11:11 AM2023-04-26T11:11:28+5:302023-04-26T11:12:44+5:30
Diabetes Symptoms and Signs: टाइप 2 डायबिटीसची लक्षण - डायबिटीस आजाराचे दोन प्रकार असतात. एक टाइप 1 डायबिटीस आणि दुसरा टाइप 2 डायबिटीस. यातील दुसरा प्रकार हळूहळू विकसित होतो आणि जास्त काळ टिकतो.
Diabetes Symptoms and Signs: डायबिटीस म्हणजे मधुमेह आजार अलिकडे फारच जास्तीत जास्त लोकांना होताना दिसत आहे. शरीरात ब्लड शुगर वाढल्याने हा आजार होतो. पायांवर चिमटा काढल्यासारखं वाटणे, पुन्हा-पुन्हा लघवी येणे, जखमा लवकर ठीक न होणे यांसारखी या आजाराची लक्षण तर सगळ्यांना माहीत आहेत. पण काही संकेत असेही असतात, जे फक्त डॉक्टरांनाच माहीत असतात.
टाइप 2 डायबिटीसची लक्षण - डायबिटीस आजाराचे दोन प्रकार असतात. एक टाइप 1 डायबिटीस आणि दुसरा टाइप 2 डायबिटीस. यातील दुसरा प्रकार हळूहळू विकसित होतो आणि जास्त काळ टिकतो. ज्याला सामान्य लोक इतर समस्यांच्या रूपात बघतात.
मानेची डार्क स्किन
मानेवरील त्वचेचा रंग काळा पडणं हे एक मधुमेहाचं लक्षण असू शकतं. हा काळपटपणा तुम्ही सहजपणे मानेवर बघू शकता. मानेवरील त्वचा जाडही असते. NCBI नुसार, या समस्येला Acanthosis Nigricans म्हणतात. जी एक डायबिटीसशी संबंधित आहे.
चक्कर येणे
थकवा, भूक आणि लो ब्लड शुगरमुळेही चक्कर येऊ शकते. पण चक्कर हाय ब्लड शुगरमुळेही येऊ शकते. कारण पुन्हा पुन्हा लघवी आल्याने शरीरात डिहयड्रेशन होतं आणि पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदुची क्षमताही कमी होते.
चिडचिडपणा
तणाव किंवा जास्त कामामुळेही व्यवहारात बदल होऊ शकतो. पण हे अनियंत्रित टाइप 2 डायबिटीज (Uncontrolled Type 2 Diabetes) मुळेही होऊ शकतं. कारण या आजारात ब्लड शुगर सामान्य लेव्हलपेक्षा अनेकदा खाली-वर होत असते. ज्यामुळे मूड स्विंग होतात.
तोंडाची दुर्गंधी येणे
जेव्हा शरीर सगळं इन्सुलिन एनर्जीसाठी वापरू शकत नाही तेव्हा शरीर फॅट सेल्सना एनर्जीसाठी तोडतं. यादरम्यान कीटोन्स नावाचं एक अॅसिड तयार होतं, जे रक्तात वाढलं तर तोंडातून एक अजब दुर्गंधी येते.
वजन कमी होणं
जर काहीच न करता वजन कमी होत असेल तर चिंतेची बाब आहे. कारण इन्सुलिनचा वापर न झाल्याने शरीर एनर्जीसाठी फॅट तोडतं. ज्यामुळे वजन अचानक कमी होऊ लागतं.
डायबिटीसमध्ये काय खावं काय खाऊ नये
डायबिटीसच्या आजार असे पदार्थ खाऊ नये ज्याने ब्लड शुगर अचानक वाढेल. जसे की, तळलेले-भाजलेले पदार्थ, मिठाई, पॅकेटमधील ज्यूस, चिप्स, बर्गर, साखर इत्यादी. डायबिटीसमध्ये लोक जीआय असलेले पदार्थ खावेत. जसे की, दाणे, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या इत्यादी.