Diabetes tips: डायबिटीसची 'ही' दोन लक्षणं तोंडाच्या आतील भागात दिसतात, उशीर होण्याआधी घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:29 PM2022-04-19T16:29:11+5:302022-04-19T16:30:02+5:30

ड्राय माऊथ म्हणजेच तोंड सुकणं आणि तोंडातून गोड किंवा फळांप्रमाणे गंध येणं ही दोन मधुमेहाची लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं हाय ब्लड प्रेशर किंवा हायपोग्लासेमिया यांच्याशी संबंधित असू शकतात.

diabetes symptoms which show inside the mouth | Diabetes tips: डायबिटीसची 'ही' दोन लक्षणं तोंडाच्या आतील भागात दिसतात, उशीर होण्याआधी घ्या जाणून

Diabetes tips: डायबिटीसची 'ही' दोन लक्षणं तोंडाच्या आतील भागात दिसतात, उशीर होण्याआधी घ्या जाणून

googlenewsNext

डायबेटीजच्या रूग्णांची संख्या आजकाल वाढताना दिसतेय. डायबेटीज म्हणजेच मधुमेहाला सायलेंट कीलर म्हटलं जातं. डायबेटीजच्या रूग्णांमध्ये वेळीच ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवली नाही तर रूग्णाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार, २०१९ या वर्षात मधुमेह हा आजार मृत्यूचं कारण बनणारा नववा सर्वात मोठा आजार होता.

तोंडाच्या आत दिसून येतात मधुमेहाची लक्षणं
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, मधुमेहाची २ प्रमुख लक्षणं आहेत जी, तोंडाच्या आतील बाजूस दिसून येतात. महत्त्वाचं म्हणजे या लक्षणांची लोकांना तातडीने माहिती होत नाही.  ड्राय माऊथ म्हणजेच तोंड सुकणं आणि तोंडातून गोड किंवा फळांप्रमाणे गंध येणं ही दोन मधुमेहाची लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं हाय ब्लड प्रेशर किंवा हायपोग्लासेमिया यांच्याशी संबंधित असू शकतात. 

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • सतत तहान लागणं
  • सतत लघवीला जाणं
  • आजारी असल्यासारखं वाटू लागणं
  • थकवा येणं
  • धुसर दिसणं
  • अचानक वजनात गट होणं
  • जखम उशीरा भरणं

जर तुम्हाला मधुमेह टाळायचा असेल किंवा तुम्ही आधीच मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल, तर तुम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.

  • फळांचा रस
  • ड्रायफ्रुट्स
  • दुग्ध उत्पादने
  • कॉफी

Web Title: diabetes symptoms which show inside the mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.