डायबिटीसमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणं घातक, वेळीच सावध झाला तर बरं होईल...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 11:55 AM2023-01-09T11:55:56+5:302023-01-09T12:00:05+5:30
Diabetes Tips: WHO नुसार, भारतात साधारण 7.7 लोक टाइप-2 डायबिटीसचे रूग्ण आहेत. ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे. तेच साधारण 2.5 कोटी लोक प्री-डायबिटिक आहेत. यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना डायबिटीसच्या परिणामांबाबत माहीत नाही.
Diabetes Tips: हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण थंडी दूर करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी गरम पाणी मदत करतं. पण डायबिटीस असताना गरम पाण्याने आंघोळ करणं सुरक्षित आहे? किंवा ही गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय शुगरच्या आजारात धोकादायक ठरू शकते?
WHO नुसार, भारतात साधारण 7.7 लोक टाइप-2 डायबिटीसचे रूग्ण आहेत. ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे. तेच साधारण 2.5 कोटी लोक प्री-डायबिटिक आहेत. यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना डायबिटीसच्या परिणामांबाबत माहीत नाही.
जर टाइप-2 डायबिटीसचे रूग्ण गरम पाण्याने आंघोळ करत असतील तर त्यांना काही फायदे मिळू शकतात. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर HbA1c लेव्हल कमी होऊ शकते. HbA1c टेस्टने गेल्या 2 ते 3 महिन्याच्या सरासरी ब्लड शुगर लेव्हरची माहिती घेता येते. ही माहिती Scimex नुसार, EASD च्या वार्षिक बैठकीत देण्यात आली होती.
पण जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं डायबिटीक रूग्णाच्या पायांसाठी फार घातक ठरू शकतं. NIDDK ने सांगितलं की, गरम पाण्याने पाय धुणे किंवा त्यात पाय भिजवल्याने त्वचा कोरडी होते. ज्यामुळे घाव, त्वचेला इजा किंवा इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. या सवयीने त्वचेची संवेदनशीलताही नष्ट होऊ शकते.
जर तुम्ही ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन इंजेक्शन घेता. तर गरम पाण्याने आंघोळ करताना काळजी घ्या. कारण सीडीसीने सांगितलं की, गरम पाणी रक्तनलिकांना रिलॅक्स करतं. ज्यामुळे इन्सुलिन वेगाने अवशोषित होतं. अशात इंजेक्शनसोबत जास्त गरम पाणी इन्सुलिन बिघडवून शुगल लेव्हल फार जास्त कमी करू शकतं.
डायबिटीसच्या रूग्णांनी त्वचेची फार जास्त काळजी घ्यायला हवी. कारण गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यांना खूप समस्या होऊ शकतात. ज्या खालील प्रमाणे आहेत.
स्कीन इन्फेक्शन
खाज किंवा रॅशेज
त्वचा कोरडी होणे
त्वचेवर सूज
जखमा लवकर न भरणे
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, फार जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे. तुम्ही आंघोळ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. तेच आंघोळ करण्याआधी त्वचेवर मॉश्चरायजर लावा आणि आंघोळ केल्यावर पायांच्या बोटांच्या मधे पावडर लावा.