अरे बापरे! वायू प्रदूषणामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक; 'या' लोकांना सर्वाधिक धोका, असा करा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:06 PM2024-07-24T12:06:33+5:302024-07-24T12:09:35+5:30
हार्ट अटॅकला अनेक घटक कारणीभूत असतात. त्यातील एक म्हणजे वायू प्रदूषण. आजकाल, वायू प्रदूषणामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इर्रेग्युलर हार्ट रिथम वाढण्याचा धोका आहे.
खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. हृदयविकार ही अशाच समस्यांपैकी एक आहे. त्यामुळे आजकाल बहुतांश लोक चिंतेत आहेत. अलिकडच्या वर्षांत हृदयविकार आणि हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. हार्ट अटॅक ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. ज्यामध्ये हृदयात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. त्यामुळे हृदयापर्यंत रक्त आणि ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचत नाही.
'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'नुसार, २०१६ मध्ये कार्डियोवॅस्कुलर डिजीजमुळे (CVD) १७.९ लोकांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे जगभरातील एकूण मृत्यूंपैकी ३१ टक्के मृत्यू यामुळे झाले. तसेच ८५ टक्के मृत्यू हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे झाले आहेत.
हार्ट अटॅकला अनेक घटक कारणीभूत असतात. त्यातील एक म्हणजे वायू प्रदूषण. आजकाल, वायू प्रदूषणामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इर्रेग्युलर हार्ट रिथम वाढण्याचा धोका आहे. वायू प्रदूषणाचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. हृदयाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर त्याचे परिणाम हे संपूर्ण शरीरालाच भोगावे लागतात.
'या' लोकांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका
आजकाल सर्व वयोगटातील लोकांना हार्ट अटॅकचा धोका असतो. याशिवाय हार्ट अटॅक, एनजाइना, बायपास सर्जरी, स्टेंटसह किंवा अँजिओप्लास्टी, स्ट्रोक, मान किंवा पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा, हार्ट फेलियर, मधुमेह किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजचा धोका खूप जास्त असतो.
ज्या पुरुषांचे वय ४५ वर्षे आहे आणि ज्या महिलांचे वय ५५ वर्षे आहे त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये स्ट्रोक किंवा हृदयासंबंधित आजार असतील तर त्यांच्या पुढच्या पुढीला देखील हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल.
'अशी' घ्या आरोग्याची काळजी
जर तुम्हाला हार्ट अटॅकपासून वाचायचे असेल तर तुम्ही दररोज अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहाराची देखील विशेष काळजी घ्या. असं केल्याने तुमचं आरोग्य उत्तम राहील. तसेच आरोग्यविषयक काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.