डायबिटीसमुळे किडनी होऊ शकते फेल, वेळीच ओळखा चेहऱ्यावर दिसणारं हे गंभीर लक्षण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:09 AM2022-06-28T11:09:15+5:302022-06-28T11:10:22+5:30
Diabetic Kidney Disease : डायबिटीसमुळे किडनीची समस्या होऊ शकते. ज्याला डायबिटीक किडनी डिजीज म्हणतात. डायबिटीस असलेल्या प्रत्येक 3 पैकी एका वयस्काला किडनीचा आजार होतो.
Diabetic Kidney Disease : जेव्हाही कुणाला काही आजार होतो तेव्हा शरीरावर काही लक्षणं दिसू लागतात. या लक्षणांवरून लक्षात येतं की, काहीतरी गडबड आहे. या लक्षणांच्या आधारावरच आजारावर उपचार केले जातात. काही आजार असेही असतात जे लवकर दिसत नाही किंवा उशीरा दिसू लागतात. डायबिटीस असाच एक आजार आहे ज्याची लक्षणं लवकर दिसत नाहीत.
डायबिटीसमुळे किडनीची समस्या होऊ शकते. ज्याला डायबिटीक किडनी डिजीज म्हणतात. डायबिटीस असलेल्या प्रत्येक 3 पैकी एका वयस्काला किडनीचा आजार होतो. डायबिटीक किडनी डिजीज तेव्हा होते जेव्हा किडनीचं फिल्टर डॅमेज होतं आणि किडनी रक्तातून लघवीत असामान्य प्रमाणात प्रोटीन रिलीज करू लागते.
ही स्थिती शरीरासाठी खतरनाक ठरू शकते. जर उपचार घेतले गेले नाही तर किडनीही फेल होऊ शकते. पण डायबिटीसची लक्षणं सुरूवातीला इतकी खतरनाक नसतात. पण काळानुसार ते गंभीर स्थिती निर्माण करू शकतात. जर डायबिटीसची समस्या वाढली तर याची लक्षणं चेहऱ्यावरही दिसू शकतात.
एक्सपर्टनुसार, डायबिटीक किडनी डिजीजची लक्षणं डोळ्यांच्या आजूबाजूला दिसू शकतात. जर कुणात डायबिटीसचा आजार वाढला तर डोळ्यांच्या आजूबाजूला सूज दिसू लागते. याचा थेट अर्थ असा होतो की, डायबिटीसमुळे किडनीवरही प्रभाव होत आहे आणि डायबिटीक किडनीचा आजार सुरू होत आहे. त्यासोबतच डायबिटीक किडनी डिजीजची खालीलप्रमाणे काही लक्षणं असू शकतात.
- विचार करण्यात समस्या
- भूक न लागणे
- वजन कमी होणे
- कोरडी, खाज असलेली त्वचा
- मांसपेशीमध्ये समस्या
- पाय आणि टाचेवर सूज
- पुन्हा पुन्हा लघवी लागणे
- पिवळी लघवी येणे
- पुन्हा पुन्हा आजारी पडणे
डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर कुणाला वर दिलेली लक्षणं दिसली तर व्यक्तीने लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. जसजसं किडनीचं काम प्रभावित होईल, तसतशा इतर समस्याही वाढत जातील. तेच जर एकदा किडनी खराब होणं सुरू झालं तर स्थिती जास्त गंभीर होऊ शकते.
या लोकांना अधिक धोका
टाइप वन डायबिटीसच्या रूग्णांच्या तुलनेत किडनी संबंधित आजारांची शक्यता अधिक असते. टाइप वन डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये डायबिटीक किडनी डिजीज कॉमन आहे. पण टाइप टू डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये सुद्धा ही समस्या बघण्यात आली आहे. डायबिटीक किडनी डिजीज किडनी फेल होण्याचं मुख्य कारण ठरू शकते. जे लोक डायलिसीसवर असतात, त्यांच्यातील प्रत्येक पाचपैकी एका व्यक्तीला डायबिटीक किडनी डिजीज असतो.