डायबिटीस रूग्णांनी गव्हाच्या चपात्यांऐवजी 'या' पिठांच्या भाकरीचं करा सेवन, होईल मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 01:32 PM2024-02-12T13:32:42+5:302024-02-12T13:33:07+5:30

Diabetes :जर तुम्हाला डायबिटीस असेल तुम्ही काही खास प्रकारच्या पिठापासून तयार चपाती खाऊ शकता.

Diabetic patients should eat these 3 types of flour instead of wheat sugar level will not increase | डायबिटीस रूग्णांनी गव्हाच्या चपात्यांऐवजी 'या' पिठांच्या भाकरीचं करा सेवन, होईल मोठा फायदा

डायबिटीस रूग्णांनी गव्हाच्या चपात्यांऐवजी 'या' पिठांच्या भाकरीचं करा सेवन, होईल मोठा फायदा

Diabetes : डायबिटीस आजच्या काळात कॉमन समस्या झाली आहे. देशभरात लोकांना शुगरची समस्या होत आहे. जगभरात भारत डायबिटीसची राजधानी बनत चालली आहे. यात व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन हार्मोनची  निर्मिती योग्यपणे होत नाही जे रक्तात शुगरची लेव्हलची मेंटेन ठेवतात. अशात रक्तात शुगर वाढते. हा एक असा आजार आहे ज्यात रूग्णांना आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी लागते आणि ही समस्या आहारात बदल करूनची कंट्रोल केली जाऊ शकते.

जर तुम्हाला डायबिटीस असेल तुम्ही काही खास प्रकारच्या पिठापासून तयार चपाती खाऊ शकता. ज्याने तुम्हाला डायबिटीस कंट्रोल करण्यात मदत मिळू शकते.

1) नाचणी

नाचणी हे एक सुपरफूड मानलं जातं. कारण यात भरपूर पोषक तत्व असतात. यात फायबर भरपूर असतं यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी याचं सेवन करावं. याच्या सेवनाने आपल्या शरीरात इन्सुलिनचं उत्पादन वाढतं आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. 

2) बाजऱ्याची भाकरी

डायबिटीसच्या रूग्णांनी बाजरीच्या भाकरीचं सेवन करणं फार फायदेशीर ठरतं. कारण बाजरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतं. याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. याने वजन नियंत्रणात ठेवण्यासही खूप मदत मिळते.

3) ज्वारीची भाकरी

ज्वारीमध्ये भरपूर फायबर असतं. यातही ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतं जे शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करतं. हे धान्य आपल्या एकंदर आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. डायबिटीसच्या रूग्णांनी ज्वारीच्या भाकरीचं सेवन करायला हवं. 

Web Title: Diabetic patients should eat these 3 types of flour instead of wheat sugar level will not increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.