पावसाळा वाढला की लगेचच होतो 'हा' गंभीर आजार, वेळीच जाणून घ्या लक्षणं अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 07:27 PM2022-08-09T19:27:08+5:302022-08-09T19:30:42+5:30

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, क्रोहन्स डिसीज, सेलियाक डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, मायक्रोस्कॉपिक कोलायटीस आणि स्मॉल इंटेस्टिइनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ (SIBO) अर्थात लहान आतड्यात जीवाणूंचे प्रमाण वाढल्याने अतिसार होऊ शकतो.

diarrhea symptoms causes remedies for monsoon | पावसाळा वाढला की लगेचच होतो 'हा' गंभीर आजार, वेळीच जाणून घ्या लक्षणं अन् उपाय

पावसाळा वाढला की लगेचच होतो 'हा' गंभीर आजार, वेळीच जाणून घ्या लक्षणं अन् उपाय

googlenewsNext

अवेळी आहार, दूषित अन्न किंवा पाणी आणि काही औषधांच्या सेवनामुळे पोटाचे विकार (Stomach Disorders) होतात. डायरिया (Diarrhea) अर्थात अतिसार हा त्यापैकीच एक विकार होय. सर्वसामान्यपणे लहान तसंच किशोरवयीन मुलांमध्ये हा आजार दिसून येतो. या वयोगटांमधल्या मुलांना जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास शरीरातलं पाणी कमी होऊन म्हणजेच डिहाड्रेशनमुळे (Dehydration) त्यांची स्थिती गंभीर होऊ शकते. पावसाळ्यात विविध कारणांमुळे ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. सध्या देशातील अनेक राज्यांना अतिसाराच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे. अतिसार होण्यामागे अनेक कारणं आहेत.

सध्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. ओडिशामधील (Odisha) रायागाडा जिल्ह्यातील काही गावांमधील सहा जणांचा अतिसारामुळे मृत्यू झाला आहे. तसंच 71 जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या लोकांनी दूषित पाणी प्यायल्याने त्यांना अतिसार झाल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती शनिवारी सूत्रांनी दिली. गेल्या दोन आठवड्यांत अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तिरप जिल्ह्यात अतिसाराचा उद्रेक झाला असून, तीन ते 10 वर्ष वयोगटातली सहा मुलं या आजारामुळे मृत्युमुखी पडल्याचं सूत्रांनी सांगितलं, याबद्दल 'ओन्ली माय हेल्थ'ने  माहिती दिली आहे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला अतिसार होतो, त्यावेळी त्याच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम होतो. यामुळे त्या व्यक्तीला सैल आणि पातळ शौचास होते. अतिसाराचं हे एक सामान्य लक्षण असून, ते फारसं गंभीर नसतं. बऱ्याच लोकांना वर्षातून काही वेळा जुलाबाचा त्रास होतो. काही लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो आणि दोन ते तीन दिवसांत तो बरादेखील होतो. इरिटेबल बाउल सिंड्रोममुळे (Irritable Bowel Syndrome) किंवा पचनासंबधित अन्य समस्यांमुळे हा त्रास होऊ शकतो. लहान किंवा किशोरवयीन मुलांना अतिसारामुळे गंभीर डिहायड्रेशन होऊ शकतं. अतिसाराचा त्रास होण्यामागे अनेक कारणं आहेत. या कारणांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

एखाद्या व्यक्तीला आतड्यात विषाणू संसर्ग (Viral Infection) झाल्याने अतिसार होऊ शकतो. सामान्यतः या स्थितीला इंटेस्टिनल फ्लू किंवा पोटाचा फ्लू (Intestinal flu) असं म्हणतात. परंतु, अतिसार होण्यामागे हे एकमेव कारण नाही. एखाद्या व्यक्तीची ओटीपोटीशी संबंधित एखादी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला अतिसार होण्याचा धोका जास्त असतो. ओटीपोटाच्या शस्त्रक्रियेत (Surgery) अपेंडिक्स, गाल ब्लॅडर, मोठं आतडं, स्वादुपिंड, लिव्हर, लहान आतडं आदींशी संबंधित आजाराचा समावेश असतो.

अल्कोहोलचा गैरवापर किंवा अतिप्रमाणात मद्यपान हेदेखील जुलाब होण्यामागे महत्त्वाचं कारण असू शकतं. कोलनचे (Colen) स्नायूच्या सिंक्रोनाइज दाबामुळे मल बाहेर टाकले जाते. अल्कोहोलमुळे ही क्रिया वाढते. यामुळे कोलनद्वारे पाणी शोषून घेण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जुलाब होत असल्याचं अनेक रुग्णांमध्ये दिसून येतं.

बॅक्टेरिया (Bacteria) अर्थात जीवाणूंचा प्रादुर्भाव हे अतिसाराच्या सर्वांत सामान्य कारणांपैकी एक आहे. दूषित अन्न किंवा पाण्यात असलेले ई.कोलाय किंवा परजीवी यांसारख्या जीवाणूंच्या संपर्कात आल्याने अतिसार होऊ शकतो. जर तुम्ही अतिसाराचा प्रादुर्भाव पसरलेल्या देशांमध्ये प्रवास करत असाल आणि जीवाणू किंवा परजीवींमुळे अतिसार झाला तर त्याला बरेचदा ट्रॅव्हलर्स डायरिया (Traveller's diarrhea) असं म्हणतात. Clostridioides difficile अर्थात C.diff हा एक प्रकारचा जीवाणू अतिसार होण्यास कारणीभूत ठरतो. बहुतांशवेळा अँटिबायोटिक औषधांचा कोर्स केल्यानंतर किंवा रुग्णालयात भरती असताना या जीवाणूचा परिणाम झाल्याचं दिसून येतं.

ट्रॅव्हलर्स डायरिया हा बऱ्याचदा अतिसाराचा तीव्र अर्थात अ‍ॅक्युट (Acute) स्वरुपाचा प्रकार असतो. काही परजीवी या अतिसाराला कारणीभूत ठरतात आणि त्याचा जास्त काळ त्रास होतो. ट्रॅव्हलर्स डायरिया होण्यामागे दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन हे प्रमुख कारण मानले जाते.

काही औषधांच्या सेवनामुळे डायरिया अर्थात अतिसार होतो. ज्या औषधांमध्ये मॅग्नेशियम असते अशी अँटिबायोटिक किंवा अँटासिड्स तसेच कॅन्सरवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळेही अतिसार होण्याची शक्यता असते. गायीचे दूध, सोया, तृणधान्य, अंडी आणि सीफूड यासारख्या विशिष्ट पदार्थांची अ‍ॅलर्जी असेल किंवा त्यांचे पचन होऊ शकले नाही तर अतिसार होऊ शकतो. ट्रॅव्हलर्स डायरियामध्ये हे कारण प्रामुख्याने दिसते. एखाद्या व्यक्तीने दुग्धजन्य पदार्थ, अन्न किंवा पेय सेवन केल्यास त्यातील लॅक्टोज इन्टॉलरन्समुळे (Lactose Intolerance) अतिसार होण्याची शक्यता असते. फ्रुक्टोज हा घटक सर्वसामान्यपणे फळे, मध आणि ज्युसमध्ये असतो. अशा पदार्थांच्या सेवन केल्यास त्यातील फ्रुक्टोज इन्टॉलरन्समुळे (Fructose Intolerance) देखील अतिसाराची लक्षणं उद्भवू शकतात. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, क्रोहन्स डिसीज, सेलियाक डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, मायक्रोस्कॉपिक कोलायटीस आणि स्मॉल इंटेस्टिइनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ (SIBO) अर्थात लहान आतड्यात जीवाणूंचे प्रमाण वाढल्याने अतिसार होऊ शकतो.

अतिसाराची लक्षणं सौम्य असतील तर उपचारांची फारशी गरज पडत नाही. पण प्रौढ व्यक्ती आरोग्याशी निगडीत समस्येवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेऊ शकतात. अतिसाराची लक्षणं दिसताच शरीर हायड्रेटेड ठेवणं आवश्यक आहे. यासाठी रोज दिवसभरात सहा ते आठ ग्लास पाणी आवश्यक आहे. तसेच यासाठी इलेक्ट्रोलाइट पेयही फायदेशीर ठरतात. अतिसाराची लक्षणं दिसताच कॅफिनयुक्त पेय पिणं टाळावं. लक्षणांमध्ये सातत्याने वाढ होत असेल तर तातडीनं वैद्यकीय तपासणी करुन उपचार घेणं आवश्यक आहे.

Web Title: diarrhea symptoms causes remedies for monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.