जुलाबाने हैराण झाला आहात? वेळीच जाणून घ्या अशावेळी काय खाऊ नये! अन्यथा गंभीर धोके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 03:13 PM2022-07-14T15:13:47+5:302022-07-14T15:20:49+5:30

जुलाब झाले असल्यास काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

diarrhea what to eat when to eat what not to eat symptoms | जुलाबाने हैराण झाला आहात? वेळीच जाणून घ्या अशावेळी काय खाऊ नये! अन्यथा गंभीर धोके

जुलाबाने हैराण झाला आहात? वेळीच जाणून घ्या अशावेळी काय खाऊ नये! अन्यथा गंभीर धोके

googlenewsNext

जुलाब लागणे (Diarrhea) हा तसा फारसा गंभीर आजार नाही. काही दिवसांमध्येच हा आजार पूर्णपणे बरा होऊन जातो. फूड पॉयझनिंग, एखाद्या औषधाचा परिणाम किंवा शिळे पदार्थ खाणं अशा गोष्टींमुळे डायरिया, म्हणजेच जुलाब होऊ शकतात. अर्थात, जर आठवड्याभरानंतरही जुलाब सुरूच राहिले, तर त्याचं कारण (Diarrhea causes) इन्फेक्शन किंवा आतड्यांची सूज असंही असू शकतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय खात आहात याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. जुलाब झाले असल्यास काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जुलाबाची लक्षणं
जुलाबाची लक्षणं (Diarrhea symptoms) ही आधी सांगणं कठीण आहे. मात्र, जुलाबांमुळे थकवा, उलटी, पोटदुखी, ब्लोटिंग, ताप येणं, विष्ठेतून रक्त किंवा पू येणं, वजन कमी होणं अशा प्रकारची लक्षणं जुलाब सुरू झाल्यानंतर हळूहळू दिसू लागतात.

डायरिया झाल्यावर काय खाऊ नये
जुलाबाचा थेट संबंध हा आपल्या खाण्याशी असतो. त्यामुळे जुलाबाची लागण झालेली असताना आपण काय खातो आणि काय खाणं (What not to eat during Diarrhea) टाळायला हवं, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. काही पदार्थ असे आहेत, जे तुमचा त्रास आणखी वाढवू शकतात. यामध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, फ्राइड, फॅटी फूड, मसालेदार पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पोर्क, कच्च्या भाज्या, कांदा, मका, आंबट फळं, दारू, कॉफी, सोडा तसंच आर्टिफिशिअल स्वीटनर घाललेले पदार्थ यांचा समावेश होतो. त्यामुळे जुलाब झालेले असताना या यादीमधील पदार्थ टाळणंच तुमच्यासाठी फायद्याचं ठरतं.

हे पदार्थ खाऊ शकता
जुलाब लागल्यानंतर जास्तीतजास्त पाणी प्यायला हवं. सोबतच, कमी चहापूड टाकलेला चहा, शहाळं हेदेखील पिऊ शकता. थोडाफार आराम मिळू लागल्यास तुम्ही केळी, भात, सफरचंद, ब्रेड, अंडी आणि शिजवलेल्या भाज्या यांचंही सेवन (What can you eat during Diarrhea) करू शकता. हे सर्व पदार्थ पचायला हलके असल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर याचा ताण येत नाही.

घरगुती उपाय
घरच्याघरी योग्य आहार, औषधं यांच्या मदतीने तुम्ही जुलाबावर उपचार (Diarrhea home remedies) करू शकता. कित्येक वेळा बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाल्यामुळे जुलाब होतात. अशावेळी अँटिबायोटिक्स औषधाची गोळी किंवा पातळ औषध घेतल्याने मदत मिळते. सोबतच प्रोबायोटिक्स खाणंही फायद्याचं ठरतं.

या घरगुती उपायांनंतरही जुलाब ठीक होत नसतील, आणि 2 दिवसांहून अधिक काळ समस्या सुरूच राहिली; तर डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे. जुलाबांमधून भरपूर पाणी जाऊन डीहायड्रेटेड झाल्याने अशक्तपणा वाटत असेल, तर तातडीने डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. गंभीर स्वरुपात जुलाब झाल्यास रुग्णालयात भरतीदेखील होण्याची गरज भासू शकते.

Web Title: diarrhea what to eat when to eat what not to eat symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.