दिवाळीत खूप खाणं झालंय ? मग आजपासुनच सुरु करा डिटॉक्स डाएट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:33 PM2022-11-02T18:33:51+5:302022-11-02T18:34:34+5:30

दिवाळीत सर्वांनीच फराळावर चांगलाच ताव मारला. त्यानंतर मात्र अनेकांनी वजन वाढल्याच्या तक्रारी सुरु केल्या असणार. मनसोक्त तेलकट, तुपकट असे पदार्थ खाल्ल्यानंतर शरिराला आराम देण्याची गरज असते.

Did you eat too much during Diwali? Now its time to do body detox | दिवाळीत खूप खाणं झालंय ? मग आजपासुनच सुरु करा डिटॉक्स डाएट

दिवाळीत खूप खाणं झालंय ? मग आजपासुनच सुरु करा डिटॉक्स डाएट

googlenewsNext

दिवाळीत सर्वांनीच फराळावर चांगलाच ताव मारला. त्यानंतर मात्र अनेकांनी वजन वाढल्याच्या तक्रारी सुरु केल्या असणार. मनसोक्त तेलकट, तुपकट असे पदार्थ खाल्ल्यानंतर शरिराला आराम देण्याची गरज असते. याचाच अर्थ बॉडी डिटॉक्स करणे आवश्यक आहे. यासाठी रोजच्या आहारात डिटॉक्स डाएटचा आजपासूनच समावेश करा. जसे आजकाल सोशल मीडियापासून काही काळ दूर राहण्यासाठी डिजीटल डिटॉक्स चा ट्रेंड आहे त्याप्रमाणेच कधीतरी बॉडी डिटॉक्स करायला हरकत नाही. 

डिटॉक्स डाएटचा फायदा

सोप्या भाषेत सांगायचे तर डिटॉक्स डाएट पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. सलग काही दिवस तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर हे डाएट शरीर डिटॉक्स करते. तुमचे यकृत, आतडे यांची कार्यक्षमता सुरळीत ठेवणे, त्यांच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ न देणे यासाठी शरीर डीटॉक्स व्हायला हवे. थोडक्यात काय तर शरीर निरोगी राखण्यासाठी अधूनमधून त्याला डिटॉक्स होऊ देणे गरजेचे आहे. 

 डिटॉक्स डाएट कसे करतात

डिटॉक्स हे नाव कितीही फॅन्सी वाटत असले तरी हे बाकी डाएटसारखे अवघड अजिबातच नाही. दैनंदिन जीवनात ज्या आहाराचा समावेश असतो तोच आहार यामध्ये घ्यायचा आहे. प्रोटीन्स आणि स्निग्ध पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला हवा. जेणेकरुन शरीराला आरामही मिळतो आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

डिटॉक्स डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश करावा

डिटॉक्स वॉटर

अगदी घरी बनवता येईल असे हे पाणी आहे. तुळस, पुदिना, आलं, लिंबू हे नैसर्गिक पदार्थ शरीराला डिटॉक्स करतात. या पदार्थांचा रस पिणे शरीरासाठी उत्तम आहे. यामुळे पचनाचेही आजार होत नाही उलट शरीर संतुलित राखण्यास मदत करते. ज्यांना पाणी प्यायचे नाही त्यांनी केवळ तुळशीची पानं किंवा लिंबाची फोड किंवा आवळ्याचा तुकडा घेतला तरी चालेल.

भाज्यांचे सूप 

दिवाळीत थंडी सुरु झाली की गरम सूप पिण्याची इच्छा होते. अशावेळी भाज्या स्वच्छ धुऊन, शिजवून बनवलेले सूप आरोग्यासाठी लाभदायक आहे. पालेभाज्या, कॉर्न यांचे सूप नियमित प्यायले तर शरीर निरोगी राहील. 

नारळ पाणी 

नारळ पाणी हे कधीही शरीरासाठी हितकारकच आहे. नारळ पाणी शरिरात ऊर्जा वाढवण्याचे काम करते. यामुळे तुमचे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते.

Web Title: Did you eat too much during Diwali? Now its time to do body detox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.