डाएट कि एक्सरसाईज? - वाढत्या वजनावर कंट्रोल करायचा ती मी काय करू?

By admin | Published: May 25, 2017 05:14 PM2017-05-25T17:14:42+5:302017-05-25T17:17:11+5:30

एक सोप्पं सूत्र. त्याचा अवलंब करा. तुमचं नुसतं वजनच नाही, आरोग्यही कायम उत्तम राहील..

Diet that Exercise? - What do I do to control growing weight? | डाएट कि एक्सरसाईज? - वाढत्या वजनावर कंट्रोल करायचा ती मी काय करू?

डाएट कि एक्सरसाईज? - वाढत्या वजनावर कंट्रोल करायचा ती मी काय करू?

Next

 - मयूर पठाडे

 
बर्‍याच जणांचा मुख्य हेतू असतो, आपलं वाढलेलं वजन कमी करण्याचा. त्यासाठी त्यांच्याकडे दोन मार्ग उपलब्ध असतात. एक म्हणजे डाएट कंट्रोल आणि दुसरा म्हणजे एक्सरसाईज.
मग काय करायचं? फक्त खाण्यापिण्यावर कंट्रोल करून आपले वाढलेले किलो कमी करायचे कि व्यायाम करून, जिममध्ये जाऊन, जॉगिंग ट्रॅकवर रनिंग करून आपलं वजन आटोक्यात ठेवायचं?
 
प्रत्येक जण आपल्याला आवडेल त्या पद्धतीचा वापर करतो. कोणी वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट कंट्रोल करतं तर कोणी घाम गाळून वजन कमी करतं.
दोन्ही गोष्टींनी वजन कमी होतंच, पण नेमकं काय करायचं, योग्य मार्ग कोणता, हा अनेकांच्या मनात प्रo्न असतो. 
 
 
 
यासाठी अर्थातच तुमच्या खाण्यापिण्यावर आणि योग्य आहारावरही तुमचं नियंत्रण हवं. समजा ज्या खाद्यपदार्थांत 500 पेक्षाही जास्त कॅलरीज आहेत, असे फास्ट फूड जर तुम्ही खात असाल तर त्याचा प्रभाव न्यूट्रल करण्यासाठी तुम्हाला चार मैलापेक्षाही जास्त पळावं लागेल. रनिंग करावी लागेल. पण असे पदार्थ खाण्याचं तुम्ही टाळलंत, कमी काबरे हायड्रेट्स असलेले पदार्थ घेतले तर वजन आटोक्यात राहील आणि धापा टाकत खूप व्यायाम करायचीही गरज पडणार नाही. 
अर्थात फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अगदी मॅरेथॉनमध्येच धावलं पाहिजे, किंवा खूप एक्सरसाईज केली पाहिजे असं नाही, मात्र तुमची हेल्थ असो, कुठला आजार असो वा वजनावर नियंत्रण ठेवायचं असो, व्यायामाला कुठलाही पर्याय असू शकत नाही. 
त्यामुळे एक सूत्र कायम लक्षात ठेवा, 75 टक्के डाएट आणि 25 टक्के एक्सरसाईज.
हे सूत्र तुमच्या आरोग्याची गाडी कायम रुळावर ठेवील.

Web Title: Diet that Exercise? - What do I do to control growing weight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.