Beard Growth : जबरदस्त बिअर्ड लूक हवा पण दाढीचे केस वाढत नाहीत? करून बघा हे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 02:27 PM2022-03-02T14:27:13+5:302022-03-02T14:27:37+5:30

Diet For Beard Growth: दाढी वाढवण्यासाठी तुमच्यासाठी व्हिटॅमिन, प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड गरजेचं आहे. याने दाढी वाढण्यास मदत मिळते आणि चमकदारही होते. 

Diet for beard growth people being crazy on your look | Beard Growth : जबरदस्त बिअर्ड लूक हवा पण दाढीचे केस वाढत नाहीत? करून बघा हे घरगुती उपाय

Beard Growth : जबरदस्त बिअर्ड लूक हवा पण दाढीचे केस वाढत नाहीत? करून बघा हे घरगुती उपाय

googlenewsNext

Diet For Beard Growth: गेल्या काही वर्षात तरूणांमध्ये दाढी आणि मिशी ठेवण्याचा ट्रेंड चांगलाच वाढला आहे. लांब दाढी आणि मिशी ठेवल्याने तरूणांच्या योग्य वयाचा अंदाज लावणही कठिण असतं. कमी वयाचे तरूण लवकर दाढी यावी आणि त्यांनाही सेलिब्रिटींप्रमाणे बिअर्ड लूक ठेवता यावा म्हणून वेगवेगळे उपाय करत असतात. अशात तुम्हाला जर दाढी वाढवायची असेल तर आपल्या डाएटमध्ये काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.  या पौष्टिक पदार्थांचं सेवन करून तुम्ही हेल्दी तर रहालच सोबतच दाढीही वाढवू शकता. दाढी वाढवण्यासाठी तुमच्यासाठी व्हिटॅमिन, प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड गरजेचं आहे. याने दाढी वाढण्यास मदत मिळते आणि चमकदारही होते. 

मसूरची डाळ

प्रोटीनचं सेवन केल्याने शरीरासोबत त्वचा आणि केसही हेल्दी होतात. सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. जर तुम्ही शाकाहारी असाल तर दाढीच्या केसांची वाढ होण्यासाठी मसूरच्या डाळीचं सेवन करू शकता. याने शरीराची प्रोटीनची कमतरता भरून निघते.

पालक 

पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलिक अॅसिड, कॅल्शिअम आणि आयर्नसारखे गुण असतात. पालकाची भाजी तर तुम्ही नेहमी खात असाल, कधी त्याचा ज्यूसही पिऊ शकता. केसांची चांगली वाढ होण्यासाठी पालक फायदेशीर ठरते. याने शरीराला आयर्न मिळतं. पालक केसांना ऑक्सीजन पोहोचवण्याचं काम करते. याने दाढी वाढण्यास मदत होते.

दालचीनी

दालचीनी आपल्या घरात असतेच. अनेक लोक दालचीनी आणि लिंबाची बेस्ट बनवून दाढीवर लावतात. कारण यातील मिनरल्स त्वचेचे पोर्स मोकळे करण्यात मदत करतात. यासोबत तुम्ही दालचीनीचं सेवनही करू शकता. याने केसांच्या मुळापर्यंत ऑक्सीजनयुक्त संचार होण्यास मदत मिळते. सकाळी गरम पाणी आणि मधासोबत दालचीनीचं सेवन केलं तर फायदा मिळेल. याने दाढी वाढते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियात झिंक भरपूर प्रमाणात असतं. जे केसांची वाढ होण्यात फायदेशीर असतं. भोपळ्याच्या बिया सहजपणे मिळतात. या बिया सुकवून ठेवा आणि वेळोवेळी याचं सेवन करा. या बिया खाल्ल्याने दाढीची ग्रोथ होण्यास मदत मिळते.

खोबऱ्याचं तेल

जर तुम्हाला दाढी वाढवायची असेल तर आहारात खोबऱ्याच्या तेलाचा समावेश करा. खोबऱ्याच्या तेलाच्या वापराने दाढीचे केस चांगले वाढतील. याने तुम्ही दाढीला परफेक्ट लूकही देऊ शकता. त्यासोबत खोबऱ्याच्या तेलाने दाढीच्या केसांची मालिश करा. 

(टिप - या लेखातील सल्ले किंवा माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. हे वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
 

Web Title: Diet for beard growth people being crazy on your look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.