डाएट की एक्सरसाइज, कशाने लवकर कमी होतं वजन?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 11:11 AM2019-01-10T11:11:13+5:302019-01-10T11:11:25+5:30

वजन कमी करायचं म्हटलं तर प्रत्येकजण वेगवेगळे उपाय ट्राय करत असतात. कुणी डाएट करतं, कुणी एक्सरसाइज करतं.

Diet or workout which is more effective for weight control | डाएट की एक्सरसाइज, कशाने लवकर कमी होतं वजन?

डाएट की एक्सरसाइज, कशाने लवकर कमी होतं वजन?

Next

वजन कमी करायचं म्हटलं तर प्रत्येकजण वेगवेगळे उपाय ट्राय करत असतात. कुणी डाएट करतं, कुणी एक्सरसाइज करतं. पण हे सगळं करुनही प्रत्येकाला वजन कमी करता येतंच असं नाही. अशात अनेकांना हे कळत नाही की, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं. अनेकजण यातच कन्फ्यूज असतात की, डाएट करावी की एक्सरसाइज? पण नुकत्यात करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. 

या रिसर्चनुसार, वजन कमी करण्यासाठी फिजिकल अ‍ॅक्टिविटीच्या तुलनेत डाएट अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या फिजिकल अ‍ॅक्टिविटीमध्ये वॉक आणि फॉर्मल एक्सरसाइजचा समावेश आहे. असं असण्याचं कारण म्हणजे एक्सरसाइजने भूक वाढते. वेट लिफ्टिंग केल्याने भूक आणखी वाढू लागते आणि यामुळे तुमच्या वजन कमी करण्याच्या ध्येयात अडचण येऊ शकते. 

किती कॅलरी होतात बर्न?

यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅंड प्रिव्हेंशनचं म्हणणं आहे की, हळूहळू वजन कमी करणारे लोक वजन कंट्रोल करण्यात यशस्वी होतात. या रिसर्चनुसार, अन्न पचन क्रियेदरम्यान १० टक्के कॅलरी बर्न होतात आणि फिजिकल अ‍ॅक्टिविटी दरम्यान जवळपास १० ते ३० टक्के कॅलरी बर्न होतात.  

आपल्या शरीरात येणाऱ्या कॅलरी या आपल्याद्वारे सेवन केल्या जाणाऱ्या पदार्थांमधून आणि पेयांमधून येतात. एक्सरसाइजने तुम्ही केवळ काही टक्के कॅलरी बर्न करु शकता. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अ‍ॅंड डायजेस्टिव अ‍ॅंड किडनी डिजीजमधील अभ्यासक अलेक्सई क्रावित्ज यांच्यानुसार, एका व्यक्तीने एक्सरसाइजच्या माध्यमातून एका दिवसात ५ ते १५ टक्के कॅलरी बर्न केल्यात.

एक्सरसाइजही गरजेची

हे म्हणणं योग्य ठरणार नाही की, एक्सरसाइज महत्त्वपूर्ण नाहीये. एक्सरसाइज शरीराला ताकद देणे, लवचिकता देणे आणि मासंपेशी चांगल्या ठेवण्यास मदत करते. नियमीतपणे एक्सरसाइज करणे एका हेल्दी लाइफस्टाइलचा महत्त्वपूर्ण भाग आहे. इतकेच नाही तर एक्सरसाइज डायबिटीज, हृदय रोग आणि ब्लड प्रेशर सारख्या समस्या कंट्रोल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पण या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइजच्या तुलनेत डाएट अधिक महत्वपूर्ण भूमिका बजावते.

सध्या वजन कमी करण्याच्या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन आले आहेत. पण हे डाएट प्लॅन प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरतील असं नाहीये. कारण प्रत्येकाही शरीर रचना ही वेगळी असते. त्यामुळे डाएट करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा. अन्यथा तुमची समस्या कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकते. कारण अनेकजण डाएटला पूर्णपणे उपाशी राहणे अशा दृष्टीकोनातून बघतात. पण पूर्णपणे उपाशी राहणे म्हणजे डाएट नाही. शरीराला आवश्यक तत्व शरीरात गेले नाही तर तुमचं वजन कमी सोडाच तुम्हाला दुसऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

Web Title: Diet or workout which is more effective for weight control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.