आजारांपासून करायचा असेल स्वत:चा बचाव तर रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 12:35 PM2022-08-15T12:35:06+5:302022-08-15T12:35:41+5:30
रात्रीच्या जेवणाच्या वेळी अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करतात, ज्यामुळे ते आजारी देखील पडतात. रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये, याविषयी माहिती जाणून घेऊया.
आहाराचा आपल्या शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. 'सकाळची न्याहारी राजासारखी, दुपारचे जेवण राणीसारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे' अशी अन्न खाण्याबाबत एक म्हण आहे. यामुळे शरीर नेहमी तंदुरुस्त राहते. पण, बरेच लोक रात्रीच्या जेवणाच्या वेळी अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करतात, ज्यामुळे ते आजारी देखील पडतात. रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये, याविषयी हर जिंदगीमध्ये दिलेली माहिती जाणून घेऊया.
रिफाइंड पीठ खाऊ नका -
रात्रीच्या वेळी रिफाइंड पिठाचा समावेश आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. रिफाइंड पीठ खाण्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. रिफाइंड केलेले पीठ लवकर पचत नाही. रिफाइंड केलेले पीठ जास्त खात असाल तर ते टाळावे. रिफाइंड पीठ हे एक प्रकारचा मैदाच असतो.
दही नको -
दह्याचा वापर हिवाळ्यात कमी पण उन्हाळ्यात जास्त होतो. अनेकजण रात्रीच्या जेवणात दह्याशिवाय जेवत नाहीत. पण, आयुर्वेदात रात्रीच्या जेवणात दही खाऊ नये, असे सांगितले आहे. रात्री दही खाल्ल्याने कफ वाढण्याची भीती असते. रात्री जास्त दही खात असाल तर सुरुवातीला प्रमाण कमी करा नंतर बंद केलेले फायदेशीर ठरेल. हृदय विकाराच्या रुग्णांनी खाणे टाळावे.
चॉकलेट खाणे टाळा -
भारतीय लोकांना जेवणानंतर गोड पदार्थ खायला आवडतात. अन्न खाल्ल्यानंतर काही गोड मिळाले नाही तर अनेकजण चॉकलेट खायला लागतात. रात्रीच्या जेवणानंतर गोड चॉकलेट खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला ही सवय बदलण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या मते, जेवणानंतर चॉकलेट खाणे म्हणजे रोगांना मेजवानी देण्यासारखे आहे. ते पचायलाही वेळ लागतो.
रात्रीच्या जेवणातही हे पदार्थ घेऊ नका -
रिफाइंड पीठ, दही आणि चॉकलेट खाण्याव्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टी आहेत ज्या आपण रात्रीच्या जेवणात टाळल्या पाहिजेत. आयुर्वेदानुसार कच्ची कोशिंबीर, जास्त मिठाई आणि पीठाचे पदार्थ टाळावेत.