फक्त वजनच कमी नाही, तर दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डाएटमध्ये करा 'हे' बदल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 05:29 PM2022-08-03T17:29:12+5:302022-08-03T17:31:52+5:30

दिवसभर तुमची एनर्जी टिकून रहावी यासाठी काही खास पदार्थांचा (Energetic food items) समावेश करणं गरजेचं आहे. हे पदार्थ कोणते आहेत याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

diet tips for energy | फक्त वजनच कमी नाही, तर दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डाएटमध्ये करा 'हे' बदल!

फक्त वजनच कमी नाही, तर दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डाएटमध्ये करा 'हे' बदल!

googlenewsNext

दिवसभर आपली एनर्जी टिकण्यासाठी सकाळचा नाश्ता (Breakfast full of energy) योग्यप्रकारे करणं गरजेचं आहे. धावपळीच्या जीवनशैली, रात्री झोप न होणं अशा बऱ्याच गोष्टींमुळे दिवसभर थकवा जाणवतो. अशात योग्य नाश्ता केला नसल्यास त्याचे आणखी दुष्परिणाम समोर येतात. त्यामुळेच, दिवसभर तुमची एनर्जी टिकून रहावी यासाठी काही खास पदार्थांचा (Energetic food items) समावेश करणं गरजेचं आहे. हे पदार्थ कोणते आहेत याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

ओट्स आणि ग्रीन टी
डाएटिंग करण्यासाठी ओट्स (Oats) आणि ग्रीन टी (Green Tea) हे दोन पदार्थ मोठ्या प्रमाणावर सुचवले जातात. याला कारण म्हणजे, या दोन्ही पदार्थांमधून तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते. ‘ग्रीन टी’मुळे थकवा दूर होतो, तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते. ओट्स तुमची सुस्ती दूर करते. ग्रीन टी तुम्ही दररोज एक कप, तसेच ओट्स तुम्ही दररोज एक बाऊल खाऊ शकता.

फळांचा करा समावेश
नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करणे भरपूर फायद्याचे ठरू शकते. विशेषतः केळी आणि संत्री (Banana and Orange benefits) या फळांचा समावेश तुमच्या नाश्त्यात असायलाच हवा. केळीमध्ये असणारे कार्ब्स हे तुम्हाला दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा (Energetic diet) देतात. तर संत्र्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरातील पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाणही मुबलक असते.

जेवणात करा या पदार्थांचा समावेश
दुपारनंतरही तुमची ऊर्जा टिकून राहण्यासाठी जेवणात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. यामध्ये दही (Curd benefits) आणि पालक (Spinach benefits) यांचा समावेश होतो. रोज एक वाटी दही खाल्ल्याने तुमच्या शरीरातील सुस्ती दूर होण्यास मदत होते. दह्यामध्ये असणारे प्रोटीन तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा देते. तर, पालकच्या भाजीमध्ये असणारे आयर्न तुमच्या शरीराचे मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. वेगाने फॅट बर्न करण्यासाठीही पालक फायदेशीर असते.

जेवणानंतर बडीशेप (Fennel health benefits) खाल्ल्यानेही बराच फायदा होतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, मात्र बडीशेपमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व असतात.

पाणी 
निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पाणी (how much water should we drink) पिणे अत्यावश्यक आहे. मुबलक प्रमाणात पाणी पिल्यामुळे आरोग्याच्या कित्येक समस्या दूर राहू शकतात. पाण्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते, आणि थकवा दूर होतो. अशा रितीने तुमच्या डाएटमध्ये थोडासा बदल करून, तुम्ही दररोजचा थकवा आणि सुस्ती दूर करू शकता.

Web Title: diet tips for energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.