अॅवोकॅडो हे सुपरफूड खाण्याचे हे खास आहेत फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 12:13 PM2018-04-18T12:13:07+5:302018-04-18T12:13:07+5:30

अॅवोकॅडो खाण्यासाठी आधी ते योग्य प्रतीचे ओळखून कसे खरेदी करावे, हे जाणून घेणे फार महत्वाचे असते.

Diet tips how many avocados can you eat week | अॅवोकॅडो हे सुपरफूड खाण्याचे हे खास आहेत फायदे

अॅवोकॅडो हे सुपरफूड खाण्याचे हे खास आहेत फायदे

googlenewsNext

अॅवोकॅडो हे एक सूपरफूड म्हणून ओळखलं जातं. आजकाल बाजारामध्ये ते सहज उपलब्ध होतं. या फळामध्ये ह्रदयाचे आरोग्य जपणारे मोनोसॅच्युरेटेड फॅट तसेच फायबर,फोलेट व व्हिटॅमिन बी ५ भरपूर प्रमाणात असतात. पण अॅवोकॅडो खाण्यासाठी आधी ते योग्य प्रतीचे ओळखून कसे खरेदी करावे, हे जाणून घेणे फार महत्वाचे असते. यासाठी न्यूट्रीशनिस्ट प्रिया काथपाल यांच्याकडून जाणून घेऊयात बाजारातून योग्य प्रतीचे अॅवोकॅडो कसे खरेदी करावे. आणि ते योग्य पद्धतीने कसे साठवून ठेवावे.

एका दिवसात किती अॅवोकॅडो खावे?

अॅवोकॅडो फळात फायबर,फोलेट पोटॅशिअम, व्हिटॅमिन आणि  मोनोसॅच्युरेटेड फॅट असतात. त्यामुळे एका दिवसात केवळ अर्धच फळ खावं, असं सांगितलं जातं. तर आठवड्यातून चार अॅवोकॅडो खावे असे सांगितले जाते.

जास्त खाऊ नये

जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, अॅवोकॅडा हे फळ कोलेस्ट्रॉल कमी करण्यात फायदेशीर ठरतं. हे फळ टोस्ट, अंड्यासोबत खाल्ल्लास याची टेस्टही चांगली लागते.  याची टेस्ट चांगली असल्याने ते सतत खाणेही योग्य नाही. कारण यात फॅट आणि कॅलरीज अधिक प्रमाणात असतात. एका अॅवोकॅडामध्ये 250 कॅलरीज आणि 20 ग्रॅम फॅट असतात. 

कसे फळ घ्यावे?

- सूपरमार्केटमधून अॅवोकॅडो विकत घेताना त्याचे बाह्य आवरण खराब न झालेले व आकाराने जड असलेले अॅवोकॅडोच खरेदी करा.

- अॅवोकॅडो विकत घेताना ते पिकलेले आहे का हे तपासणे फार महत्वाचे आहे. यासाठी त्याचे बाह्य आवरण हलक्या हाताने दाबून पहा. मात्र असे करताना लक्षात ठेवा की तुमच्या हातामुळे ते फळ खराब होणार नाही. कारण दाबल्यामुळे फळ तुटू शकते.

- कधीकधी मऊ झालेले अॅवोकॅडो तुटू देखील शकते.त्यामुळे या फळाची परिपक्वता तपासण्यासाठी तुम्ही आणखी एक पद्धत वापरु शकता. यासाठी तुम्ही त्याचे बाह्य तपकिरी आवरण वरच्या बाजूने जरासे सोलून पाहू शकता. जर ते आवरण सहजपणे निघाले व त्याच्या आतील गर हिरव्या रंगाचा असेल तर ते फळ पिकलेले आहे असे समजा.तसेच जर ते बाह्य आवरण सहज निघत नसेल व त्याच्या आतील गर देखील तपकिरी रंगाचाच असेल तर ते फळ पिकलेले नाही असे समजा.

अॅवोकॅडो कसे साठवून ठेवाल?

अनेकजण अॅवोकॅडो पिकून तयार होईपर्यंत ते बाहेर टेबलवर ठेवतात. ते लवकर पिकण्यासाठी त्यांच्यासोबत तुम्ही सफरचंद, केळी व पिअर्ससारखी इतर फळे देखील ठेऊ शकता. जर तुम्ही अति पिकलेले अॅवोकॅडो खरेदी केले तर ते तसेच ताजे रहावे यासाठी, ते पिकलेले फळ तुम्ही पाच दिवसांपर्यंत फ्रीजमध्ये साठवून ठेऊ शकता. कापलेल्या अॅवोकॅडोच्या फोडींवर तुम्ही थोडेसे लिंबू पिळून व प्लॅस्टिक रॅपमध्ये घट्ट बांधून तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेऊ शकता व गरजेनूसार त्याचा वापर करु शकता.

Web Title: Diet tips how many avocados can you eat week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.