वजन वाढलंय? टेन्शन नको...! कमी करण्यात मेडिसीन प्रमाणे काम करतात या 5 फायबरयुक्त गोष्टी, आजपासूनच खायला सुरुवात करा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 12:54 PM2024-06-06T12:54:39+5:302024-06-06T12:57:54+5:30
...मात्र, अशा 5 गोष्टी आहेत ज्यांचा रोजच्या आहारात समावेश केला तर वजन कमी होण्यास मदत होऊ शकेल. तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या पाच गोष्टी...?
आजकाल सर्वच जण हेल्दी आणि फिट राहण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात. तसेच, लठ्ठपणाचा सामना करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. अशा लोकांसाठी वजन कमी करणे एखाद्या आव्हानापेक्षा नक्कीच कमी नाही. यासाठी ते जीम, योगा आणि डायेट प्लॅन आदींसारखे उपाय करताना दिसतात. मात्र, अशा 5 गोष्टी आहेत ज्यांचा रोजच्या आहारात समावेश केला तर वजन कमी होण्यास मदत होऊ शकेल. तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या पाच गोष्टी...?
भाज्या -
वजन कमी करण्यासाठी स्टार्च नसलेल्या भाज्या जसे की, ब्रोकोली, पालक, गाजर, केळी आणि स्प्राउट्सचा आपण आपल्या दैनंदिन आहारात समावेश करू शकतो. या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर अधिक असते. यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत मिळते.
फळे -
धावपळीच्या जीवनशैलीत लोक फळांएवजी जूसला अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र, ज्यूसच्या तुलनेत फळांमध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. यामुळे ज्यूस ऐवजी फाळांचे खायला हवीत. जसे की, सफरचंद, जांभूळ, संत्री आदी...
बीन्स, हरभरा आणि डाळी -
बीन्स, हरभरा आणि डाळी यांमध्ये फायबर आणि प्रोटिन्स अधिक प्रमाणात असतात, यांमुळे वारंवार भूक लागत नाही. यांचे सेवन केल्यास शरिराला उर्जा मिळते आणि वजन कमी करण्यातही मदत मिळते.
अखंड धान्य -
ओट्स, जव, क्विनोआ आणि गहू यांसारखे अखंड धान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अखंड धान्यात परिष्कृत धान्यांपेक्षाही अधिक फायबर आणि पोषक तत्व असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
नट्स आणि सीड्स -
नट्स आणि सीड्सचा विचार करता, जवस, बदाम, चिया सिड्स आणि भोपळ्याच्या बिया. यांत केवळ फायबरच नाही, तर भरपूर प्रमाणावर हेल्दी फॅट आणि प्रोटिन्सदेखील असतात. जे तब्येतीसाठी अतिशय उत्तम मानले जाते. याचीही वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.
एव्होकॅडो -
एव्होकॅडो (Avocado) हे एक असे फळ आहे, जे खाण्यासाठी तर चवदार आहेच, पण त्यात मोठ्या प्रमाणावर फायबर आणि हेल्दी फॅट देखील आहे. हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर फळ आहे. म्हणूनच त्याला सुपरफूड असेही म्हटले जाते.