प्रवास करताना पोट फुगलं तर डायटिशिअनने सांगितला एक सोपा उपाय, Acidity सुद्धा होईल दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:15 PM2024-08-02T16:15:04+5:302024-08-02T16:28:54+5:30
Healthy Foods: न्यूट्रीशनिस्ट सिमरन यांनी ही समस्या दूर करण्यासाठी एक उपाय सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी तीन मसाल्यांपासून तयार एका ड्रिंकचं सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.
Healthy Foods: थोडं जरी काही चुकीचं खाल्लं किंवा कधी आवडीचे पदार्थ जास्त खाल्ले तर पोटासंबंधी समस्या होतात. अनेकांना प्रवासादरम्यान पोट फुगणे, अॅसिडिटी होणे किंवा मळमळ अशा समस्या होतात. अशा काही समस्या झाल्या तर प्रवासही नकोसा वाटतो. तुम्हालाही प्रवासादरम्यान पोट फुगण्याची किंवा अॅसिडिटीची समस्या होत असेल तर एक सोपा उपाय आहे. न्यूट्रीशनिस्ट सिमरन यांनी ही समस्या दूर करण्यासाठी एक उपाय सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी तीन मसाल्यांपासून तयार एका ड्रिंकचं सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. चला जाणून घेऊ या ड्रिंकचे फायदे...
डायटिशिअन सिमरन यांनी प्रवासादरम्यान ब्लोटिंग किंवा अॅसिडिटीची समस्या झाली तर जिरे, ओवा आणि बडीशेपचं खास ड्रिंक पिण्यास सांगितलं. हे ड्रिंक तयार करण्यासाठी तिन्ही गोष्टी हलक्या भाजून घ्या. त्यानंतर यांचं पावडर तयार करा. नंतर हे पावडर एका एअरटाईट डब्यात ठेवा.
जेव्हाही तुम्हाला प्रवासादरम्यान पोट फुगण्याची किंवा अॅसिडिटीची समस्या जाणवेल तेव्हा हे एक चमचा पावडर गरम पाण्यात टाकून सेवन करा. याने ब्लोटिंग, अॅसिडिटी आणि मळमळ या समस्या दूर होण्यास मदत मिळेल. हे ड्रिंक तुम्ही सकाळी जेवण केल्यावर किंवा फार जास्त काही खाल्ल्यावर पिऊ शकता. याने तुम्हाला लगेच आराम मिळेल.
प्रवासादरम्यान काय काळजी घ्याल
आधीच प्लानिंग करा
अनहेल्दी पदार्थ खाण्याऐवजी प्रवासात सोबत काही हेल्दी पदार्थ ठेवा. काही ड्राय फ्रूट्स खाऊ शकता. तेलकट, जास्त मसालेदार काहीही खाऊ नका.
भरपूर पाणी प्या
प्रवासादरम्यान भरपूर पाणी प्यायला हवं. कारण भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहतं. डिहायड्रेशनमुळे अनेक जास्त भूक लागते आणि त्यात ओव्हरईटिंग केलं जातं.
किती आणि काय खाताय
प्रवासा दरम्यान तुम्ही बाहेर काय आणि किती प्रमाणात खाता यावर लक्ष द्यायला हवं. एकतर तुम्ही कमी खा किंवा थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खा.