तेल, तूप की बटर डायटिशिअनने सांगितलं आरोग्यासाठी यापैकी काय चांगलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 09:45 AM2024-06-18T09:45:03+5:302024-06-18T09:45:34+5:30
तेल, तूप आणि बटर यातील आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? असाही एक प्रश्न समोर येत असतो. अशात आज आपण डायटिशिअनकडून हे जाणून घेणार आहोत की, यातील आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय ठरतं.
भाजीला तडका देण्यासाठी किंवा वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी तेल किंवा तूपाचा वापर केला जातो. बरेच लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी बटरचा वापर करतात. पण तेल, तूप आणि बटर यातील आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? असाही एक प्रश्न समोर येत असतो. अशात आज आपण डायटिशिअनकडून हे जाणून घेणार आहोत की, यातील आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय ठरतं.
डायटिशिअन श्वेता जे पांचाल यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे की, तेल, तूप किंवा बटरचे काय फायदे आहेत किंवा काय नुकसान आहेत.
श्वेता यांनी सांगितलं की, तेल, तूप आणि बटरपैकी एकाची निवड करावीच लागेलच. पण यातील हेल्दी काय आहे हेही समजून घेतलं पाहिजे. बटरबाबत सांगायचं तर यात सोडिअम जास्त असतं आणि हाय अनॅचुरेटेड फॅट्स असतं. जर तुम्ही बटर किंवा चीजसारखे फॅटी फूड्स खात असाल तर याने शरीरात ट्रायग्लीसेराइड वाढतं. ट्रायग्लीसेराइडची शरीराला गरज असते, याने शरीराची ऊर्जा वाढते. पण जेवण केल्यावर ८ तासांमध्ये याचा वापर झाला नाही तर हे शरीरात फॅटच्या रूपात जमा होतं. अशात आठवड्यातून २ वेळ बटरचं सेवन केलं जाऊ सकतं. जास्त सेवन कराल तर याने शरीराला नुकसान होतं.
तेलाबाबत सांगायचं तर तेल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यांमध्ये ट्रान्स फॅट्स असतात जे हृदयरोगाचं कारण बनतात. या तेलांमध्ये ओमेगा-६ आणि ओमेगा - ३ जास्त असतात ज्यामुळे शरीरात इंफ्लेमेशन वाढतं.
तूपाचं सेवन केल्याने गट हेल्थ म्हणजे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. इंफ्लेमेशन कमी होतं आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यासही मदत मिळते. हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. जर याचं योग्य प्रमाणात सेवन केलं गेलं तर शरीरात वाढलेलं बॅड कॉलेस्ट्रोल कमी करण्यास मदत मिळते. पण जर तुम्ही आधीच हाय फॅट असलेले पदार्थ खात असाल तर तूपाचं सेवन कमी केलं पाहिजे.